आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमदार पावसामुळे पर्यटकांना खुणावु लागली \'कपीलधार\'; रामेश्वर धबधब्याने वेधले लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील कपीलधार व पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर धबधबा ओसंडून वाहु लागले आहेत. पावसाळी पर्यटणांना हे धबधबे खुणावू लागले आहेत. या ठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

दरम्यान, तब्बल दीड महिन्यांच्या दडी मारलेला पाऊस महाराष्‍ट्रात परतला आहे. राज्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस होत आहे. या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा तर खरीपाला जीवदान मिळाले आहे. 

बीड तालुक्यातील कपीलधार हे क्षेत्र विरशैव समाजाचे श्रध्दास्थान असुन या ठिकाणी महानयोगी मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी आहे. या मंदिर परिसरातील गवारी व रत्नागिरी या दोन्ही धारा सध्या वाहु लागल्या आहेत. उंचावरून धबधबा कोसळत असल्याने या ठिकाणी भाविकांची गर्दी उसळत आहे.   बीड जिल्ह्यात दुसरे पर्यटनस्थळ असलेल्या पाटोदा तालुक्याच्या सरहद्दीवरील सौताडा येथील प्रसिध्द  रामेश्वर धबधबा ओसंडून वाहु लागला आहे. उंच कड्यावरून दरीत झेपावणारा हा जलप्रपात पाहण्यासाठी बीड जिल्ह्यासह पश्चीम महाराष्ट्रातील पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...मांजर घाटातील कपिलधार येथील निसर्गरम्य आणि सौताडा येथील प्रसिद्ध रामेश्वर धबधब्याचे फोटो आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...