आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावकार म्हणाला- तुझी मुलगी-सून माझ्या घरी पाठव, नंतर गहाण शेती मिळेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - लाडक्या लेकीच्या लग्नासाठी शेती गहाण ठेवून सावकाराकडून पैसे उचलले. नंतर त्या पैशांची व्याजासह परतफेड करूनही सावकाराने गहाण ठेवलेली जमीन हडप केली. शेतकऱ्याने सावकाराकडे जमीन परत मागितली. मात्र, हा व्यवहार संपुष्टात आणायचा असेल तर तुझी मुलगी आणि सून माझ्याकडे पाठवून दे, अशी धक्कादायक मागणी निर्ढावलेल्या सावकाराने केली. हा प्रकार बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील कारी येथे घडला.

या धक्कादायक प्रकाराची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून बीडच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. कारी येथील शेतकरी इंदर मुंडे यांनी नोव्हेंबर २००९ मध्ये मुलगी जिजाबाईच्या लग्नाचा खर्च फेडण्यासाठी गावंदराचे सरकारी सावकार भगवान बडे यांच्याकडून १ लाख ३५ हजार रुपये कर्ज घेतले. त्यासाठी त्यांनी १ एकर ३६ गुंठे बागायती शेती गहाण ठेवली. इंदरने २०१२ पर्यंत कर्जाचे मुद्दल फेडले. त्यानंतर २०१५ मध्ये व्याजही फेडले. कर्जाची व्याजासह परतफेड झाल्यामुळे गहाणखत रद्द करून शेती मला परत द्या, अशी मागणी त्यांनी सावकाराकडे केली. मात्र शेती परत देतो म्हणून त्याने एप्रिल २०१६ मध्ये कोऱ्या बाँडवर इंदरच्या सह्या घेऊन शेती हडप केली. या शेतीचा भाव १० लाख रुपये एकर आहे.

इंदरने सावकाराकडे तगादा लावल्यावर त्याने त्यांच्याकडे आणखी ५० हजार रुपये मागितले. शिवाय तुझी मुलगी आणि सून माझ्याकडे पाठवून दे, अशी मागणीही केली. दरम्यान, सावकाराकडून होत असलेली पिळवणूक आणि मुलगी- सुनेची मागणी याबाबतची माहिती इंदर मुंडेंनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिली आहे. सावकाराच्या या मागणीची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी गंभीर दखल घेतली असून पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडून कारवाईचा अहवाल मागवला आहे.आता हा शेतकरी शेती परत मिळवण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषणाला बसला आहे.
इच्छामरण द्या
जमीन परत द्या, या मागणीसाठी चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मात्र, प्रशासनाने दखल न घेतल्याने मला कुटुंबीयांसह इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी इंदर मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे.
पुढील स्लाईडवर वाचा.... याबद्दल काय म्हणाले बीडचे पोलिस अधीक्षक अनिल पारसकर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...