आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरेचा कडवटपणा वाढला, ५ महिन्यांत हजार रुपयांची वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - किराणा बाजारात साखरेच्या दरवाढीचा अालेख कासवगतीने वाढत अाहे. पाच महिन्यांत क्विंटलमागे एक हजार रुपयांची झालेली वाढ सामान्यांना परवडणारी नसल्याचा सूर उमटत अाहे, तर सामाजिक व अार्थिक पातळीवर गाेडवा अाणणारी असल्याने या दरवाढीचे स्वागत केले पाहिजे, असा मतप्रवाह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या संघटनांच्या नेत्यांमध्ये अाहे.
अाॅक्टाेबरपासून पाच महिन्यांत किराणा बाजारात साखरेच्या दरात सुरुवातीला अतिशय संथगतीने व नंतर काहीशी झपाट्याने वाढ हाेत गेली. पाच महिन्यांत क्विंटलमागे जवळपास एक हजार रुपयांची वाढ झाली अाहे. इतर जीवनावश्यक तसेच खाद्यवस्तूंच्या दरातही किरकाेळ प्रमाणात तेजीचे वारे अाहे. दैनंदिन जीवनात महत्त्वाचा घटक असलेल्या साखरेचे भाव किरकाेळ बाजारात सध्या ३४ ते ३५ रुपये किलाे अाहेत. ग्राहक भाववाढीबद्दल चर्चा करतात, तिखट प्रतिक्रिया व्यक्त करतात, परंतु महागाई अंगवळणी पडलेले ग्राहक दरवाढ नाइलाजाने स्वीकारतात, असे किराणा बाजाराचा कानाेसा घेतल्यानंतर जाणवले. साखरेचे दर गगनाला भिडणारे नसावेत, परंतु सर्वसामान्यांना परवडणारे असावेत, असे शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या नेत्यांचे म्हणणे अाहे. दरम्यान, अागामी दिवाळीपर्यंत साखरेचे दर शंभरी गाठतील असा अंदाज व्यापार क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत अाहेत.

उतारा कमी दाखवतात
साखरेचे भाव वाढत अाहेत ही चांगली बाब अाहे. अाधीच्या सरकारने निर्यातबंदीची चुकीची भूमिका घेतली हाेती. खासगी साखर कारखान्यांचा उतारा प्रतिटन साडेअकरा ते बारा असताना बहुतांश कारखान्यांनी उतारे कमी दाखवले. अप्रत्यक्षरीत्या ही साखर काळ्या बाजारात पाेहोचली. साखर, कांदा खायला लागतोच किती? शेतकरी सन्मानाने जगवायचा असेल तर शेतीमालाला याेग्य भाव मिळालाच पाहिजे, असे शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष कालिदास अापेट म्हणाले. साखर कारखानदारी ही शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर केंद्र व राज्य सरकारची तिजाेरी भरण्यासाठी अाहेत. नॅशनल शुगर फंड कशासाठी? एकीकडे सातवा वेतन अायाेग द्यायचा अन् दुसरीकडे नगण्य अशी स्थिती अाहे. शेतीमाल कमी दरात मिळताेय हे अर्थशास्त्राशी सुसंगत नसल्याचे अापेट म्हणाले.

नियंत्रणातून गाेडवा राखा
साखर ही जीवनावश्यक वस्तूंमध्ये माेडते. इतर किराणा वस्तूंच्या दरात हळूहळू वाढ हाेत अाहे. डाळींचे भाव अजूनही शंभरच्या खाली नाहीत. डाळी, शेंगदाणे यांना पर्याय अाहे. मात्र, साखरेला टाळून चालत नाही. चहा, सरबत, पाहुणे अाले तर चहा, गाेड पदार्थ नित्याचेच अाहे. साखरेच्या दरवाढीवर सरकारने नियंत्रण ठेवले तरच गाेडवा कायम राहील.
-शशिकांत कुलकर्णी, नागरिक बीड

दरवाढीचे स्वागत करावे
ब्राझीलमध्ये उसाला ९ हजार, पाकिस्तानात सहा हजार पाचशे रुपये भाव अाहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात मात्र २ हजार २०० रुपयांच्या पलीकडे भाव मिळत नाही हे विसंगत अाहे. साखरेची दरवाढ झाल्याने फार फरक पडणार नाही. साेने खरेदी करताना भाववाढीचा विचार करत नाहीत. साखर दरवाढीचे स्वागत केले पाहिजे.
-कालिदास अापेट, शेतकरी नेते
भाव मर्यादेपर्यंत असावे
साखरेच्या दरातील वाढ चांगली बाब अाहे. उसाला याेग्य भाव मिळाला तर ऊस उत्पादन वाढेल. साखर उद्याेगावर शेतकरी, ऊसताेड कामगार, ट्रक, ट्रॅक्टरचालक, गाडीवान, साखर कामगार अवलंबून अाहेत. साखरेवर अवलंबून असलेले उद्याेग क्षेत्र ३३ टक्के अाहे. त्यामुळे साखरेचे भाव मर्यादेपर्यंत वाढले पाहिजे तसेच भाव स्थिर राहिले पाहिजेत.
-भाई गंगाभिषण थावरे, शेतकरी नेते
बातम्या आणखी आहेत...