आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठा आला जोत्याखाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर यातील गिरजा, अंबाडी, कोल्ही, बोरदहेगाव या चार प्रकल्पांचा जलसाठा हा जोत्याखाली आला आहे. नारंगी प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाला मोठीच कसरत करावी लागणार, हे आता स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात जायकवाडी हा एकमेव मोठा प्रकल्प आहे. जायकवाडीच्या जलसाठ्यावर औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड व बीड जिल्ह्यातील काही भाग अवलंबून आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यात चौदा मध्यम प्रकल्प आहेत. या मध्यम प्रकल्पांतून संबंधित तालुक्याच्या गावात असलेल्या जनतेची तहान भागवली जाते, परंतु गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ पाठ सोडेना. त्यामुळे जिल्ह्यातील १४ पैकी एकही मध्यम प्रकल्प शंकर टक्के भरलेला नाही. त्यामुळे टँकरवरच ग्रामीण जनतेची तहान भागवली जात आहे.

औरंगाबाद व सिल्लोड तालुक्यात प्रत्येकी दोन, कन्नड व वैजापूर तालुक्यात प्रत्येकी चार, तर गंगापूर व फुलंब्री तालुक्यात प्रत्येकी एक असे एकूण चौदा मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी गिरजा (फुलंब्री), अंबाडी (कन्नड), कोल्ही व बोरदहेगाव (वैजापूर) या चार मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जाेत्याखाली आहे. आता केवळ मृतसाठा शिल्लक आहे. तर वैजापूर तालुक्यातीलच नारंगी मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. पैठण तालुक्यात एकही मध्यम प्रकल्प नाही. त्यामुळे वैजापूर व पैठण तालुक्यातील सर्वात जास्त टँकर लागणार आहेत. कन्नड तालुक्यातील नागदजवळील गडदगड (७७), पूर्णा नेवपूर (५१), अंजना पळशी (४३) या प्रकल्पांत पाणीसाठा शिल्लक आहे. नारंगी कोरडा तर कोल्ही आणि बोरदहेगाव प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली आहे.

गावकऱ्यांचा पाणी सोडण्याचा अट्टहास
मध्यम प्रकल्पावर त्या-त्या तालुक्यातील गावांची पिण्याच्या पाण्याची भिस्त अवलंबून आहे. मागील तीन वर्षांचा कठीण काळ पाहता या तलावांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवावा, अशी मागणी होत आहे. परंतु पालकमंत्र्यांच्या अट्टहासामुळे लघुसिंचन विभाग तलावातील पाणी सोडण्याच्या तयारीत आहे.
बातम्या आणखी आहेत...