आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Strike News In Marathi, Banks Workes Stop In Marathwada, Divya Marathti

मराठवाड्यात बँकांचे काम ठप्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जिल्ह्यातील 100 राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँक शाखांतील 700 कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. यामध्ये सुमारे 500 कर्मचारी सहभागी झाले आहेत. विविध संघटनांच्या बँक अधिकारी व कर्मचा-यांनी शिवाजी पुतळा परिसरातील एसबीएच बँकेसमोर निदर्शने केली. खंडेलवाल कमिटीच्या एकतर्फी शिफारशी रद्द करा, बँकिंग सेवांचे कंत्राटीकरण रद्द करा, बँकिंग नियमन कायद्यातील अनिष्ट बदल त्वरित थांबवा, बुडीत कर्जदारांची नावे जाहीर करून त्यांच्याकडे असलेले 23 हजार कोटी रुपयांचे कर्ज त्वरित वसूल करा, ग्रामीण भागातील शाखा बंद करणे त्वरित थांबवा, अनुकंपा तत्त्वावर भरती चालू करा, मानवसंसाधन प्रश्नावरील एकतर्फी मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी त्वरित थांबवा आदी मागण्यांसाठी संप पुकारला आहे.

बीडमध्ये 700 बँक कर्मचारी सहभागी : संपात बीड जिल्ह्यातील 700 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. स्टेट बॅँक आॅफ हैदराबाद मुख्य शाखेच्या बाहेर नऊ कर्मचारी संघटनांच्या पदाधिका-यांनी शासनाच्या विरुद्ध घोषणा दिल्या. बीड जिल्ह्यात राष्‍ट्रीयीकृत बॅँकांची 27 संख्या असून त्यांच्या 75 शाखा आहेत. दोन दिवस होणा-या संपामुळे एक हजार 400 कोटी रुपयांचा व्यवहार टप्प झालेला आहे. तसेच मराठवाड्यातील नांदेड, परभणी या जिल्ह्यांतील बँक कर्मचा-यांनीदेखील बंद पाळला. त्यामुळे येथेही आर्थिक व्यवहार ठप्प होते.