आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Strong Massage To Karnataka Govt By Ex Minister Arjun Khotkar About Belgaon Issu

..तर मराठवाड्यातील कन्नड भाषक अडचणीत, अर्जुन खोतकर यांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - कर्नाटकात भाषा आणि प्रांताच्या नावाखाली पोलिसांकडून मराठी भाषकांवर अन्याय होत आहे. हे प्रकार असेच सुरू राहिले, तर मराठवाड्यातही हजारो कन्नड भाषक लोक राहतात, त्यांचा कर्नाटक सरकारने विचार करावा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसैनिक जशास तसे उत्तर देण्यास तयार आहेत, अशा शब्दांत माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.

कर्नाटकातील येळ्ळूर येथील महाराष्ट्र चौक पोलिस बंदोबस्तात तोडण्यात आला होता. या प्रकारामुळे सीमा भागातील मराठी नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता. कर्नाटकातील मराठी भाषकांवर सातत्याने अशा प्रकारचे अन्याय-अत्याचार होत असून हे प्रकार थांबले पाहिजेत, अशी अपेक्षा माजी मंत्री खोतकर यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.