आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Died In Fight With Another Boy In School

दोन मुलांतील हाणामारीदरम्यान गळा आवळला गेल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचाेरा/ भडगाव - तालुक्यातील गिरड येथे शाळा सुरू हाेण्यापूर्वी जवाहर हायस्कूलच्या प्रांगणात पाचवी वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची हाेऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात किशाेर दगडू चव्हाण (पांचाळ) या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. किशाेरचा गळा अावळला गेल्याचा प्राथमिक अंदाज अाहे. बुधवारी सकाळी ११.३० वाजता ही घटना घडली.

विद्यालयात सकाळच्या सत्रात ११ वी, १२ वी तर दुपारच्या सत्रात पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग चालतात. दुपार सत्राची शाळेची वेळ १२ वाजेची असली तरी अकरा-सव्वाअकरा वाजेपासून विद्यार्थी शाळा अावारात जमू लागतात. शाळा भरण्यास वेळ असल्याने विद्यार्थी मस्ती करतात. त्याचदरम्यान किशाेरची साेबत खेळणाऱ्या विद्यार्थ्याशी झटापट हाेऊन किशाेरचा गळा अावळण्यात अाल्याचा संशय अाहे. त्यामुळे त्याचा श्वास राेखला गेला. साेबतच्या मित्रांनी शिक्षकांना ही बाब सांगताच शिक्षक वर्गाकडे धावले. त्यांनी किशोरला गिरड गावातील खासगी दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचार करून पाचाेरा ग्रामीण रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पाेलिसांनी काही विद्यार्थ्यांचे जबाब घेतले मात्र मृत किशाेरची काेणत्या विद्यार्थ्याशी झटापट झाली हाेती, याची माहिती पाेलिसांना मिळाली नाही. यासंदर्भात पाेलिसात खेळताना मृत्यू झाल्याची नाेंद करण्यात अाली अाहे. अकस्मात मृत्यूची नाेंद करून गुन्हा शून्य क्रमांकाने भडगाव पाेलिसांकडे वर्ग करण्यात अाला अाहे.

कुटुंबावर दु:खाचा डाेंगर
किशाेरचे वडील सुतारकाम करून उदरनिर्वाह करतात. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून किशाेरच्या जाण्याने या कुटुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला अाहे. त्याच्या अाई-वडिलांना ग्रामीण रुग्णालयात अश्रू अावरणे कठीण झाले हाेते.

गळ्यावर नखे लागल्याचे व्रण
मृत किशाेरच्या गळ्यावर नख लागल्याचे व्रण अाढळून अाले अाहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात अाला. दरम्यान, घटनेला शाळेतील शिक्षक जबाबदार असून त्यांचे विद्यार्थ्यांकडे लक्ष नसल्याने किशाेरला प्राण गमवावा लागला असल्याचा अाराेप त्याच्या कुटुंबातील पालकांनी केला अाहे. मृत्यूस कारणीभूत असलेल्या विद्यार्थ्याला ताब्यात घ्यावे, अशी मागणी मृत किशाेरच्या कुटंुबीयांनी केल्याने पाचाेरा ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.