आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात भरदिवसा विद्यार्थ्याचे अपहरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
लातूर - येथील एका नामांकित इंग्रजी शाळेत आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे शुक्रवारी भरदिवसा अपहरण करण्यात आले. तथापि नागरिकांची समयसूचकता, पोलिसांची तत्परता व कारला झालेला अपघात यामुळे अपहरणाचा डाव फसला व चारपैकी दोन अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्या मुसक्या पोलिसांनी अावळल्या असून त्यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
योमीन जीतेन गंगर (१३) असे विद्यार्थ्याचे नाव असून त्याचे वडील कपड्याचे व्यापारी आहेत. योमीन हा ट्यूशनहून विशालनगरमधील त्याच्या घराकडे जात असताना चंदेरी रंगाची एक स्विफ्ट डिझायर कार त्याच्याजवळ येऊन थांबली. त्यात चार व्यक्ती होत्या. त्यातील एक व्यक्ती कारमधून उतरली व त्याने योमेनला जवळ बोलावले. तो येताच त्याला जबरदस्तीने कारमध्ये कोंबले. हा प्रकार पाहून योमेनने मम्मी म्हणून जोराची हाक मारली. त्यामुळे जवळपासच्या नागरिकांचे लक्ष या प्रकाराकडे गेले. कार लागलीच भरधाव निघून गेली. या कारने पुढे एका पत्रकाराच्या गाडीला कट मारला. त्यामुळे त्यांनी पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांना मोबाइलवरून याबाबत कळवले.
नागरिकांचेही फोन एसपींना गेले आणि एसपींनी लातूर जिल्ह्यासह शेजारील बीड, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यातील सर्व मार्गांवर नाकेबंदीचे आदेश दिले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही योमीन सायकलवरून ट्यूशनला जात असताना त्याला दोन व्यक्तींनी हटकले होते. तथापि तो त्यांच्याकडे गेला नाही. त्यामुळे हा कट पूर्व नियोजित असल्याची शंका योमीनचे काका अजय गंगर यांनी व्यक्त केली.

कार बंद पडली
अंबाजोगाई रोडवर बर्दापूर फाट्यानजीक एका कारला टिप्परने समोरून जोराची धडक दिली. यात कारचे बोनेट, रेडिएटर व समोरची काच फुटली व कार बंद पडली. हा अपघात पाहण्यासाठी नागरिक तेथे जमले. पोलिसांची गाडीही आली आणि कारमधील एक जण तेथून जाणाऱ्या एकाच्या मोटारसायकलवर पसार झाला. पळत जाणाऱ्या दोघांचा नागरिकांनी रानोमाळ पाठलाग करून त्यांना पकडले. एक अपहरणकर्ता कारजवळ सुरा घेऊन थांबला होता. त्यालाही मोठ्या शिताफीने पोलिसांनी पकडले. कारमध्ये हात-पाय बांधलेल्या
अवस्थेत योमीन आढळला.
बातम्या आणखी आहेत...