आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीच्या प्रवेशासाठी जाणारा मुलगा ठार; आईसह चाैघे जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई- गेवराईहून बीडला  निघालेली प्रवासी रिक्षा  धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रांजणीजवळ उलटून एक  विद्यार्थी  ठार तर अन्य चार जण जखमी  झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी एक वाजता घडला.  नितीन दहिफळे (१७, रा.खंडाळा, ता.बीड ) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.  गढी येथील नवोदय विद्यालयात अकरावीच्या  अॅडमिशनसाठी तो आईसह आला होता, परंतु टक्केवारी कमी असल्याने त्याला प्रवेश मिळाला नाही. शेवटी  आईसह तो बीडकडे निघाला होता.  

गेवराई येथून बीडकडे प्रवाशांना घेऊन रिक्षा (एम एच २३ सी ७४२९) निघाली होती. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रांजणीजवळ  दुपारी रिक्षा उलटून झालेल्या अपघातात  नितीन अशोक दहिफळे (१७, रा.खंडाळा, ता.बीड ) हा जागीच ठार झाला, तर त्याची आई लोचना दहिफळे (४२)  यांच्यासह रिक्षातील नारायण सावंत ( ६३, रा. रांजणी ), सुरेखा सव्वासे (३२, रा. साष्ट पिंपळगाव, ता.अंबड) व अन्य एक असे चार  प्रवासी जखमी झाले. त्यांना  बीडहून  गेवराईकडे येणारे  विजय सुतार व अक्षय सुतार यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात  दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.  

कमी टक्केवारीमुळे प्रवेश मिळाला नाही   
नितीन अशोक दहिफळे  हा विद्यार्थी  मंगळवारी त्याच्या आईबरोबर गढीच्या नवोदय विद्यालयात अकरावी   अॅडमिशनसाठी आला होता,  परंतु टक्केवारी कमी असल्याने  त्याला प्रवेश मिळाला नाही. कन्नड येथील नवोदय विद्यालयात प्रवेश मिळेल, असे प्राचार्यांनी सांगितले यानंतर तो आईसह गेवराईहून रिक्षाने  बीडकडे  निघाला.  वाटेत रांजणी पाटीजवळ रिक्षा उलडून नितीन  ठार झाला.  

गढीच्या विद्यालयातदहावी उत्तीर्ण
नितीनच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले. त्याची आई खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात मदतनीस म्हणून काम  करते.  गढी येथील नवोदय विद्यालयात नितीन सहावीपासून  शिक्षण घेत होता. दहावीच्या परीक्षेत  तो ६५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. नितीन एकुलता  मुलगा असल्याने कुटुंब शोकाकुल झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...