आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदानामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम - कुमार केतकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लातूर - देशातील नागरिकांना गॅस, रॉकेल, खत, डिझेल, पेट्रोल आदी वस्तूंवर अनुदान देऊन सवलती दिल्या जात आहेत. त्यामुळे सरकारचे मोठे नुकसान होत असून त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे मत दैनिक दिव्य मराठीचे मुख्य संपादक पद्मश्री कुमार केतकर यांनी रविवारी व्यक्त केले.

उदगीर येथील उज्ज्वला देशमुख स्मृती व्याख्यानमालेत ‘आधुनिक भारताची पायाभरणी’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर यांची उपस्थिती होती. ते म्हणाले, अनुदानित वस्तूंच्या किमती वाढवल्यास तीव्र आंदोलने होतात; परंतु टी.व्ही., फ्रीज, मोबाइल यासारख्या वस्तुंची खरेदी करताना घासाघासी होत नाही. हा वैचारिक मागासलेपणा असून, अशा मनोवृत्तीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. स्वातंत्र्यानंतर देशात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले गेले. जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे व सर्वात कमी भाडे असलेली रेल्वेची सेवा असलेला भारत एकमेव देश आहे. तरीही आपल्याकडे रेल्वेची सेवा स्वस्तात असावी, अशी मानसिकता बनली आहे.