आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ.सुदाम मुंडेच्या कोठडीत वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी वैजनाथ - बेकायदा गर्भलिंगनिदान व स्त्री भ्रूणहत्या प्रकरणात अटकेत असलेले डॉ. सुदाम मुंडे यांच्यासह पाच जणांच्या न्यायालयीन कोठडीत 12 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
परळी वैजनाथ येथील मुंडे हॉस्पिटलमध्ये 18 मे रोजी भोपा येथील विजयमाला पटेकर या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. याप्रकरणी डॉ. सरस्वती व डॉ. सुदाम मुंडे यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
18 जूनपासून दोघेही वेगवेगळ्या स्वरूपाच्या कोठडीत आहेत. विजयमाला पटेकर हिची 16 मे रोजी जळगाव येथील डॉ. राहुल कोल्हे यांनी गर्भलिंगनिदान तपासणी केली होती. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून डॉ. कोल्हेदेखील कोठडीत आहेत. विजयमाला पटेकर हिच्या गर्भाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याप्रकरणी सुग्राबी शेख रहीम, नूरजहाँ सय्यद अन्वर या दोघींना 20 जून रोजी पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून त्याही कोठडीतच आहेत.
डॉ. सरस्वती मुंडे, डॉ. सुदाम मुंडे, डॉ. राहुल कोल्हे, सुग्राबी शेख, नूरजहाँ सय्यद या पाच जणांची न्यायालयीन कोठडीची मुदत संपली होती. शनिवारी परळी न्यायालयात पाचही जणांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याच्या मागणीचा अर्ज पोलिसांनी दाखल केला होता.
पोलिस निरीक्षक गाडेकर निलंबित - परळी येथील डॉ. सुदाम मुंडे व डॉ. सरस्वती मुंडे यांच्या रुग्णालयात झालेल्या स्त्री भ्रूणहत्या प्रकरणाच्या तपासकामामध्ये निष्काळजीपणा केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद येथील विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी निलंबनाचे आदेश काढले. डॉ. मुंडेच्या रुग्णालयात स्त्री भ्रूणहत्याप्रकरणी परळी शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक गाडेकर यांनी गुन्ह्यातील कलमे लावण्यात गडबड करणे, निष्काळजीपणा, पोलिस कोठडी मागणीसह अन्य कारणे चौकशीत पुढे आली. त्यामुळे गाडेकर यांच्या निलंबनाचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षकांनी काढले.