आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे यांचे हैदराबादमध्ये निधन, उद्या नांदेडमध्ये अत्यंसंस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्य संग्राम सेनानी, नांदेड भूषण सुधाकरराव डोईफोडे यांचे बुधवारी सकाळी 10.35 वाजता हैदराबाद येथील ग्लोबल रुग्णालयात निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. गेल्या काही दिवसापासून ते यकृताच्या विकाराने आजारी होते.
दहा दिवसांपूर्वीच त्यांना ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणाही होत होती. परंतु बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता त्यांना रुग्णालयातच हृदयविकाराचा तीव्र झ्राटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे दोन्ही पुत्र धनंजय व शंतनु रुग्णालयात त्यांच्याजवळ होते. त्यांचे पार्थिव हैदराबाद येथून आणण्यात आले. गुरुवारी सकाळी 10 वाजता त्यांची अंत्ययात्रा भाग्यनगरस्थित त्यांच्या निवासस्थानावरुन निघणार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अनेक मान्यवरांनी त्यांच्या भाग्यनगर स्थित निवासस्थानाकडे धाव घेतली.
अल्पपरिचय
जन्म- 14 सप्टेबर 1937
शिक्षण- एल.एल.बी. (पुणे विद्यापीठ)
वयाच्या 12 व्या वर्षापासून वृत्तपत्रीय लिखाण
15 व्या वर्षापासून वार्ताहर म्हणून नवशक्ती, लोकमित्र, मराठवाडामध्ये कार्यरत
1956 पासून दै.लोकसत्ताचे वार्ताहर
1952 पासून मनमाड-नांदेड ब्रॉडगेजसाठी रेल्वे आंदोलनात सक्रिय
1 जून 1962 रोजी प्रजावाणी साप्ताहिक सुरू केले. पुढे त्याचे दैनिकात रुपांतर
1967-74 आणि 1984 ते 1991 या कालावधीत नांदेड नगरपालिकेचे सदस्य
1985-86 मध्ये नगरपालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती
निझाम राजवटीविरुद्ध लढा, रेल्वे, भाववाढ विरोधी, संयुक्त महाराष्ट्र, कच्छ बचाव, भूमिमुक्ती, मराठवाडा विकास आदी आंदोलनात सक्रिय सहभाग.