आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sudhir Mungantiwar News In Marathi, MLA, Divya Marathi

आघाडी सरकारने फसवणूक केली - सुधीर मुनगंटीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना आघाडी सरकारने टंचाई जाहीर केली आहे. ही शेतक-यांची फसवणूक असून शेतक-यांच्या भावनेशी खेळणा-या या सरकारला त्याची जागा दाखवा, असे आवाहन भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी सोमवारी उदगीर येथे केले.
आमदार सुधाकर भालेराव यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
खासदार डॉ. सुनील गायकवाड, संभाजी पाटील निलंगेकर, आमदार सुधाकर भालेराव, नागनाथ निडवदे, रामचंद्र तिरुके यांची प्रमुख उपस्थिती होती. मनगुंटीवार म्हणाले की, आघाडी सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे. शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत. निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतक-यांना आधार देण्याऐवजी त्यांना अडचणीत टाकण्याचे पाप हे राज्य सरकार करीत आहे. देश भ्रष्टाचार, विषमता व भयमुक्त करण्याचे काम महायुती करणार असून महायुतीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

गटबाजी उघड
शहरात विद्यमान आमदार भालेराव यांनी मेळावा, तर माजी आमदार केंद्रे यांनी मोर्चा असे वेगवेगळे कार्यक्रम ठेवले होते. केंद्रे यांनी काढलेल्या पत्रिका व दिलेल्या जाहिरातीत भालेराव यांचा नामोल्लेख नव्हता. यामुळे भाजपतील गटबाजी उघड झाली होती. शिवाय भालेरावांचा गट केंद्रे यांच्या मोर्चात, तर केंद्रे यांचा गट भालेरावांच्या मेळाव्याला उपस्थित नव्हता.