आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईबाबांच्या विचारांचा जगभर प्रसार व्हावा : सुधीर मुनगंटीवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - साईबाबांची शिर्डी ही प्रेरणा व सेवाभाव देणारी भूमी असल्याचे सांगताना साई समाधी शताब्दी सोहळ्याच्या माध्यमातून साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या विचाराचा जगभरात प्रसार करा, असे आवाहन वित्त आणि नियोजन तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. शिर्डी येथे अायाेजित साईमंदर विश्वस्तांच्या जागतिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते.
या वेळी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, खासदार सदाशिव लोखंडे, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप आहेर उपस्थित होते.
या वेळी जलसंपदामंत्री महाजन म्हणाले, नाशिक येथे पार पडलेल्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर शिर्डीतील साई समाधी शताब्दी सोहळ्याचे नियोजन केले जाणार आहे. यासाठी शासनस्तरावरून आवश्यक ती मदत केली जाईल. साईबाबा संस्थानने शिक्षण, आरोग्य यासारख्या सामाजिक उपक्रमात सहभाग घ्यावा.
साईबाबांची महती सातासमुद्रापार पोहाेचली आहे. ‘सबका मालिक एक’ हा साईंचा संदेश आजच्या काळात मौलिक ठरत आहे. साईंचा समाधी शताब्दी सोहळा जगात सर्वत्र साजरा व्हावा व त्यातून साईंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करावा. शिर्डीत समाधी शताब्दी निमित्ताने पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी सरकारकडे आपलाही पाठपुरावा सुरू आहे.
राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र
साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र अवघ्या विश्वाला दिला आहे. साईंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याची भूमिका भास्कर वृत्तपत्र समूहाने स्वीकारलेली आहे. दै.भास्कर वृत्तपत्र समूह देश-विदेशातील साई मंदिरे, समाधी शताब्दी वर्षातील उपक्रम साईभक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी अग्रेसर राहील.
प्रशांत दीक्षित, स्टेट एडिटर, दिव्य मराठी
बातम्या आणखी आहेत...