आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऊस दरवाढीचे आंदोलन पेटले, 3 शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार; परभणी फाट्यावर रास्ता रोको

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे उसाला भाव देण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी एक हजार शेतकऱ्यांनी कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरील परभणी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले.  यादरम्यान शेतकऱ्यांनी तीन रस्त्यावर टायर जाळले. शेतकऱ्याकडून होत असलेली ही जाळपोळ पाहून पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यात तीन शेतकरी किरकोळ जखमी झाले आहेत. या वेळी  तहसीलदारांनी मध्यस्थी केली. त्यामुळे येत्या २७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी ऊस उत्पादक, प्रतिनिधी व साखर कारखानदारांची बैठक घेणार आहेत.    


पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे बीड जिल्ह्यात उसाला भाव देण्यात यावा. २६५ जातीच्या वाणाच्या उसाची नोंद साखर कारखानदारांनी करावी. माजलगाव येथील छत्रपती साखर कारखाना व कारखान्याने मागील वर्षी टनामागे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहाशे रुपये कमी दिले होते.

बातम्या आणखी आहेत...