आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसाची पहिली उचल म्हणून देणार २१०० रु. , विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - उसाची पहिली उचल म्हणून २१०० रुपये देण्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बुधवारी केली. त्यामुळे २०१६-१७ गळीत हंगामातील उसाची पहिली उचल घोषित करणारा छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग हा मराठवाडा विभागातील पहिला साखर कारखाना ठरला आहे.

चितेपिंपळगाव येथील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याच्या १६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी दुपारी गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून झाला त्या वेळी बागडे यांनी अध्यक्षीय भाषणात भावाची घोषणा केली. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार संदिपान भुमरे, प्रशांत बंब, अतुल सावे, डॉ. भागवत कराड, माजी मंत्री नामदेवराव गाडेकर यांची उपस्थिती होती. हरिभाऊ बागडे म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे साखर कारखाना आम्ही जपून व निगुतीने चालवतो. शंभर किमी अंतरावरून ऊस आणून इतरांबरोबर भाव देतो. मागच्या वर्षी कारखाना सुरू केला तेव्हा साखरेला २३००-२४०० रुपये क्विंटल भाव होता. तरी शेतकऱ्याच्या हातात जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतील कारखान्यांपेक्षा जास्त म्हणजे १९५० रुपये भाव दिला. यावर्षी आता साखरेचा भाव ३२०० ते ३२५० रुपये क्विंटल आहे. राज्यात कुणीही उसाचा भाव घोषित करायला तयार नाही. जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील कारखाने मी काय भाव घोषित करतो याकडे लक्ष देऊन आहेत. यावर्षी शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे त्यांच्या मनासारखा भाव द्यावा लागेल म्हणून पहिली उचल २१०० रुपये देण्याची घोषणा बागडे यांनी केली.

हजार-पाचशेच्या नोटा रद्द, आता तुम्ही-आम्ही सारखेच
भाषणात चतुरंग व हजरजबाबी रावसाहेब दानवे यांनी व्यासपीठावरील पाहुण्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खळखळून हसवले. १९९५ पूर्वी ऊस कारखानदारांचीच कशी मक्तेदारी होती व आज काय परिस्थिती आहे हे पटवून दिले. पंतप्रधान मोदींनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून धाडशी निर्णय घेतला. त्यामुळे रात्री बारा वाजेपासून तुम्ही-आम्ही सारखेच झाल्याचे सांगताच हशा पिकला.
बातम्या आणखी आहेत...