आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आत्महत्येची 7 पैकी 2 प्रकरणे पात्र, जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - गेल्या दोन महिन्यांत नोंदल्या गेलेल्या ७ शेतकरी आत्महत्या प्रकरणांपैकी २ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून इतर पाच प्रकरणांमध्ये नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या झाल्या नसल्याचे आढळून आले आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्यांबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली. या वेळी गेल्या दोन महिन्यांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची प्रकरणे आर्थिक मदतीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आली. त्यामध्ये सेनगाव तालुक्यातील रिधोरा येथील शिवाजी किसन रोडगे व औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी येथील भाऊराव बाबाराव चिभडे या दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारी आणि नापिकीमुळे आत्महत्या केल्याचे सबळ कारणांमुळे निष्पन्न झाले, तर मधुकर गारगार (अनखळी), अशोक कदम (वारंगा फाटा), सीताराम क्यातमवार (कुरुंदा), मारोती वाशीमकर (औंढा नागनाथ) व हिंगोली तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या आत्महत्येचे प्रकरण बैठकीत नामंजूर झाले आहे. या प्रकरणांमध्ये मृताच्या वारसांनी सबळ पुरावे दिल्यावर पुढील बैठकीत पुन्हा एकदा चर्चा करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...