आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; दोन लेकरांसह एकाची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील ३५ वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत झालेली मुले आपली नाहीतच या समजापोटी दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडली. महेंद्र बळीराम घोडगे (३५) आणि राजरत्न (६) व जय (४) अशी अशी मृतांची नावे आहेत.
अनेक दिवसांपासून पती व पत्नीत क्षुल्लक कारणावरून वाद चालू होता. आज दुपारी असाच घरगुती वाद झाल्यावर महेंद्र याने राजरत्न व जय या दोन्ही मुलांना सोबत घेतले आणि घराबाहेर पडला. बराच वेळ झाला तरी मुले व पती घरी आले नसल्याने मृताची पत्नी प्रतिभा हिने सासू-सासरे व घरच्या इतरांना वाद झाल्याची माहिती दिली. यानंतर शोधाशोध केली असता गोरेगाव रस्त्यावरील विहिरीत तिघांचे शव तरंगताना आढळून आले. दुपारी ४ वाजता ही घटना उघडकीस आल्यावर मृतांची ओळख पटली. गोरेगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर सिटीकर यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा मृत महेंद्रची पत्नी प्रतिभा हिच्या माहितीवरून घटनेची नोंद करण्यात आली. प्रतिभाच्या जबाबानुसार, पती महेंद्र हा नेहमीच तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, ही मुले माझी नाहीतच असे म्हणून वाद घालीत होता. सर्वांना जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यातूनच त्याने स्वत:सह दोन्ही मुलांना जिवे मारले, असे प्रतिभाने जबाबात म्हटले आहे.