आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचे शिक्षकाशी संभाषण व्हायरल; पित्याची आत्महत्या, िशक्षकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - अल्पवयीन मुलीशी मोबाइलवरील संभाषणाचा आॅडिओ व्हाॅट्स अॅपवर व्हायरल झाल्याने वडिलाने आत्महत्या केल्या प्रकरणातील संशयित आरोपी शिक्षक तुकाराम शिंदे (रा. शिवाजीनगर, करमाळा) याचा अटकपूर्व जामीन येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी शुक्रवारी फेटाळला. मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणीही शिक्षक शिंदे याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून आरोपी शिंदे हा गायब आहे.
यातील पीडित अल्पवयीन मुलगी ही करमाळा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षकाने तिचा विनयभंग केला. तसेच तिच्याशी मोबाइलवरील संभाषणाचा आॅडिओ व्हॉटस अॅपवर व्हायरल झाला. हा प्रकार पीडित मुलीच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी दोन आॅगस्ट रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली. त्यावरून संशयित आरोपी शिंदे याच्यावर करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी शिंदे याने येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी शिंदेचा जामीन फेटाळला.