आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीच्या पाटाचे पाणी कपाशीत शिरल्याने नुकसान, तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- जायकवाडीच्या पाटाचे पाणी कपाशीत जाऊन पिकाचे नुकसान झाल्याने  माजलगाव तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी अकरा वाजता घडली. वचिष्ट प्रभाकर घुंबरे (२८)असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

वचिष्ट याने रविवारी सकाळी ११ वाजता शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. त्याने आत्महत्येपूर्वी  सुसाइड  नोट लिहून  ठेवली होती. त्यात  जायकवाडीच्या पाटाचे पाणी शेतातील कपाशीच्या पिकात गेल्याने पिकाचे नुकसान झाले अाहे. तसेच आजारास कंटाळून आत्महत्या करत असल्याचे  नोटमध्ये लिहिले आहे.  या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात विठ्ठल आसाराम तौर यांनी माहिती दिली. 
बातम्या आणखी आहेत...