आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नापिकीच्या चिंतेतून युवा शेतकऱ्याची आत्महत्या, जालन्‍यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन- पावसाने उघडीप दिल्याने पिकांची वाढ खुंटली. त्यामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. अप्पा रावसाहेब जाधव असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विष प्राशन केले होते. शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  
 
१७ ऑगस्ट रोजी अप्पा जाधव (३२,सावखेडा, ता. भोकरदन, जि. जालना) हे शेतात कपाशीवर कीटकनाशक फवारणीसाठी गेले होते. शेतात मका व कपाशी सुकत असल्याचे पाहून त्यांना नैराश्य आले होते, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. याच चिंतेतून त्यांनी १७ ऑगस्ट रोजी विष प्राशन केले. शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अप्पा जाधव यांना उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सावखेडा येथे शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोळा सण अवघ्या एक दिवसावर आला असताना हा प्रकार घडल्याने सावखेडा गावावर शोककळा पसरली आहे. अप्पा जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील व भाऊ असा मोठा परिवार आहे. 
बातम्या आणखी आहेत...