आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमित्रा होंडे खून प्रकरण: साडेगावातून विलासचे कपडे, चप्पल केली जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- अंबड येथील सुमित्रा होंडे यांचा खून केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या विलासला शनिवारी साडेगावला नेऊन तेथून त्याचे कपडे व चप्पल जप्त केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गेल्या तीन दिवसांपासून पोलिस कोठडीत असलेल्या विलासला कुणीही भेटायला आलेले नव्हते. मात्र, शनिवारी सकाळी त्याची बहीण शेगावहून त्याला भेटण्यासाठी आली. पोलिसांच्या परवानगीनंतर दोघांमध्ये काही मिनिटे संभाषणही झाले. बहिणीने अनेक प्रश्न विचारल्यावरही विलास काहीच बोलला नाही. यामुळे पोलिसांनी भेटीसाठी दिलेली वेळ संपल्यावर निरुत्तर विलासला बघतच बहीण निघून गेली. गेल्या सोमवारी दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान सुमित्रा होंडे यांचा रिव्हॉल्व्हरने गोळी घालून खून केल्याची कबुली विलासने दिलेली आहे. विलास हा घाबरलेला असून पोलिसही त्याची कसून चौकशी करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...