आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचा उत्तराधिकारी येणारा काळच ठरवेल : सुळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण, हे येणारा काळच ठरवेल. उत्तराधिकारी हा रक्तातल्या नात्याचाच असावा लागत नाही, कारण शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचे उत्तराधिकारी समजले जातात. ते रक्ताचे नाते कोठे होते, असे सुप्रिया सुळे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
युवती मेळाव्यानंतर पत्रपरिषदेत खासदार सुळे म्हणाल्या, जनमानसात जाऊन जो काम करील, नागरिकांच्या समस्या सोडवेल त्याला लोक आपोआप लीडरशिप देतात. त्यामुळे शरद पवारांचा उत्तराधिकारी लोकच निवडतील. नवीन लीडरशिप पुढे आली पाहिजे, उभी राहिली पाहिजे म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना करण्यात आली. सतरा जिल्ह्यांत याचे काम सुरू झाले आहे. युवतींना हक्काचे व्यासपीठ या माध्यमातून मिळणार आहे. व्होट बँक तयार करण्यासाठी युवती काँग्रेस काढली नाही. 50 वर्षांत महाराष्ट्रात एकही महिला मुख्यमंत्री झाली नाही. पुढे राष्ट्रवादीला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाल्यास आपण मुख्यमंत्री होणार का? यावर त्या म्हणाल्या की, मी 2029 पर्यंत बारामतीची खासदार म्हणूनच काम करणार आहे.
हुंडा, अल्पवयीन मुलीचे लग्न हे विषय अजेंड्यावर- स्त्री भ्रूणहत्या, हुंडा, लहानवयातील मुलींचे लग्न व मुलींचे शिक्षण या समस्या युवती काँग्रेसच्या अजेंड्यावर आहेत. यासाठी काम करणा-या तरुणींसाठी युवती मंचची स्थापना केली आहे. राज्यभर या मंचला युवतींचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने येणा-या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन घडणार असल्याचे सुळे यांनी गुरुवारी ओम गार्डन येथे आयोजित राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यात सांगितले. या वेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, आमदार शंकरअण्णा धोंडगे, प्रदीप नाईक, माजी खासदार गंगाधरराव कुंटुरकर आदींची उपस्थिती होती. त्या म्हणाल्या की, महिला आणि युवतींचे प्रश्न वेगवेगळे आहेत. ते सोडवण्यासाठी वेगळे व्यासपीठ असले पाहिजे अशी शरद पवारांची इच्छा होती. म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून युवतींचे व महिलांचे प्रश्न सोडवण्यात येणार आहेत. स्त्री भ्रूणहत्या ही सगळ्या समोरील समस्या आहे. त्याचबरोबर हुंडा पद्धत बंद करण्यासाठी सगळ्यांनी मिळून आवाज उठविण्याची गरज आहे.
युवती काँग्रेसच्या माध्यमातून हुंडाबंदीची चळवळ उभी करायची आहे. हुंडा देऊन नवरा विकत घेण्याची पद्धत चुकीची आहे. जर कोणी हुंडा मागत असेल तर त्याची धिंड काढून पोलिस ठाण्यात घेऊन जा असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी या वेळी दिला. मेळाव्यात अनेक युवतींना आपल्या समस्या मांडण्याची संधी देण्यात आली.
पवार धूर्त राजकारणी! 'राष्ट्रवादी'तील मित्र मतदान करतील; संगमा यांचा दावा
बाळासाहेब ठाकरे- प्रणवदा भेटीदरम्यान शरद पवारांची 'TEA DIPLOMACY'ची इच्छा
शरद पवार हे अविश्वासू आणि बेभरवशाचे- अर्जुनसिंगांच्या पुस्तकात टीकास्त्र