आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Dhas News In Marathi, Revenue Minister, Divya Marathi

निवडणुकीची रणधुमाळी: राज्यमंत्री सुरेश धस सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - सलग तीन वेळा आष्टी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादीचे आमदार, महसूल राज्यमंत्री सुरेश धस या वेळी सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यानच पक्षाकडून शब्द घेतल्यानुसार जवळच्या जामखेड-कर्जत मतदारसंघातून स्वत: तर आष्टीतून समर्थक अथवा अन्य पक्षातील उमेदवार शोधण्याची तयारी चालवली आहे.

मे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा िनवडणुकीत िदवंगत खासदार गोपीनाथ मुंडे यांना स्वत:च्या िजल्ह्यात पराभूत करण्याचा चंग राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अिजत पवार यांनी बांधला होता. यासाठी त्यांनी सुरुवातीपासून उमेदवारी जाहीर करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना लढण्यासाठी दबाव आणला; परंतु क्षीरसागरांनी सुरुवातीपासूनची भूिमका कायम ठेवली. मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीला बळ एकवटून लढण्यास कोणी हिंमत दाखवत नसताना धाडसाने पुढे झालेले महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी पवार काका-पुतण्यांचा शब्द मानला; परंतु त्याच वेळी िवधानसभेच्या दोन जागा देण्याची मागणी मान्य करून घेतली होती, अशी मािहती सूत्रांकडून देण्यात आली. अट मान्य होताच मोठ्या िहमतीने धस यांनी मुंडे या एकेकाळच्या राजकीय गुरूशी मुकाबला
केला; परंतु त्यांना हार पत्करावी लागली.

लोकसभा िनवडणुकीआधीपासूनच धस यांनी जामखेड-कर्जत मतदारसंघातील लोकांशी संपर्क वाढवलेला होता. िनवडणुका जाहीर होण्याअगोदर दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेऊन चाचपणी केली होती. जम्मू-काश्मिरात पावसाने थैमाने घातल्याने मदत व पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री असलेले धस मागील आठवड्यात तातडीने श्रीनगरला रवाना झाले. दोन िदवस तेथे मदतकार्य करून महाराष्ट्रातील तीनशेवर नागरिकांची सुटका करून ते महाराष्ट्रात परतले. िनवडणुका जाहीर होईपर्यंत आिण अगदी काल-परवापर्यंत ही बाब गोपनीय ठेवणाऱ्या धस यांनी मतदारसंघ बदलाचे बुधवारी स्पष्ट संकेत िदले.

भाजपला शह देण्यासाठी मागणी
कोल्हापूरला राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी झाला. त्या िठकाणी जामखेड-कर्जत मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे घेण्याची तसेच भाजपला शह देण्यासाठी तगडा उमेदवार देण्याची मागणी केली. श्रेष्ठींनी चाचपणी करण्याचे आदेश िदल्यानंतर पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे राज्यमंत्री सुरेश धस यांनी सांगितले.

मराठा मतदार निर्णायक
जामखेड-कर्जत मतदारसंघ भाजप आिण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला असला, तरी एक-दोन गावांचा अपवाद वगळता वंजारी मतदारांची संख्या नगण्य आहे. मराठा आिण अन्य मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. २ लाख ९२ हजार मतदार या मतदारसंघात असून २००९ मध्ये आरक्षण हटवून हा मतदारसंघ खुला झाला आहे. या िठकाणी मुसंडी मारण्याची धस यांनी तयारी चालवली आहे. आपल्या हक्काच्या आष्टी मतदारसंघातून स्वत:च्या जवळची व्यक्ती अथवा अन्य पक्षातून एखाद्या नेत्याला राष्ट्रवादीत आणून मैदानात उतरवण्याचे नियोजनही धस यांनी केले असल्याची मािहती सूत्रांकडून िमळाली.

मतदारसंघ बदलण्यास तयार
सर्वांचे एकमत झाल्यास आपण मतदारसंघ बदलण्यास तयार आहोत. आष्टी तर माझे होमग्राउंड असून पक्ष देईल त्या उमेदवारास िनवडून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी आहे. जामखेड-कर्जतमधील भाजप उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आपण राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी स्वीकारण्यास पक्षश्रेष्ठींना लवकरच होकार कळवणार आहोत.
- सुरेश धस, महसूल राज्यमंत्री