आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यकांता पाटलांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, सर्व पर्याय खुले असल्याची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सर्व पर्याय खुले असल्याचे त्यांनी रविवारी दुपारी विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

पक्षात मिळालेली अपमानास्पद वागणूक सहन न झाल्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. शनिवारी रात्री मी पक्षाकडे राजीनामा पत्र फॅक्स केले. कार्यकर्त्यांनी काय भूमिका घ्यावी हे सर्वस्वी त्यांनी ठरवावे. जो चांगला पर्याय असेल त्या दिशेने मी राजकीय वाटचाल करेल, असेही त्यांनी सांगितले.यापूर्वी मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना भेटले, परंतु ही पक्ष प्रवेशासाठीची भेट नव्हती. नितीन गडकरींशीही माझे कॉलेज जीवनापासून व्यक्तिगत संबंध आहेत, असेही पाटील म्हणाल्या.

शरद पवारांवरच राग
माझा केवळ पक्षाध्यक्ष शरद पवारांवरच राग आहे. राजीनाम्यानंतर ते माझी समजूत काढतील या भ्रमात मी अजिबात नाही. ते कधीही कोणाची मनधरणी करत नाहीत. राष्ट्रवादीत तेच सर्वेसर्वा आहेत. त्यांचे पक्षात कोणी ऐकत नाही असा जो आभास माध्यमांनी निर्माण केला तो चुकीचा आहे, असे सांगत सूर्यकांता पाटील यांनी आपल्या भूमिकेची कारणमीमांसा केली.