आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suryakanta Patil News In Marathi, NCP, Divya Marathi, Sharad Pawar

सूर्यकांता पाटलांनाही हवंय ‘राष्ट्रवादी’चं व‍िल‍िनीकरण, दिग्विजयसिंहांशी सहमत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - ‘शरद पवारांनी झालं गेलं व‍िसरून राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेस पक्षात व‍िलीनीकरण करावे,’ या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या मताला राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या व माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. सूर्यकांता पाटील या पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.

"दिव्य मराठी'शी बोलताना पाटील म्हणाल्या की, विदेशीच्या मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेस पक्षापासून फारकत घेऊन वेगळी चूल मांडली. स्वतंत्र निवडणुकाही लढवल्या. त्यानंतर गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून एकत्र सत्तेत आहेत. केंद्रात आणि राज्यातही आघाडीने सरकार स्थापन केले. प्रदीर्घ काळ सत्ता एकत्र उपभोगली. आता विदेशीचा मुद्दाही राहिला नाही. जे दोन पक्ष गेली १५ वर्षे एकदिलाने, एकमताने सरकार चालवत आहेत, देशात एकत्र दौरे करीत आहेत, अशा वेळी एकाच घरात दोन वेगळ्या चुली मांडून कार्यकर्त्यांना निष्कारण संभ्रमावस्थेत का ठेवायचे? दोन्ही काँग्रेसने एकत्र येणेच आता काँग्रेसच्या हिताचे आहे व काळाची गरज आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अस्वस्थतेतून दिलेला सल्ला
हिंगोलीच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली नव्हती. त्यांचा मतदारसंघ कॉंग्रेसला देऊन राष्ट्रवादीने पाटील यांचे एकप्रकारे पंखच छाटले होते. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या पाटील सध्या भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. याच नाराजीतून त्यांनी आपल्या पक्षाला सल्ला िदल्याचे मानले जाते.