आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suspended Police And His Three Friends Gangarape On Girl Child

बडतर्फ पोलिसासह तीन मित्रांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - बडतर्फ पोलिसाने तीन मित्रांसह अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना भोकर तालुक्यातील सीताखंडी घाटात घडली. व्हॅनचालक राजू खांडरे, संदीप हामंद, चंद्रमा रिसॉर्टचा मालक अशोक मारकवाड, ऑटोचालक अब्दुल माजिद या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी बडतर्फ पोलिस कॉन्स्टेबल सुनील सांभाळकर व बाळू लामगे दोघे फरार आहेत.

हिमायतनगर तालुक्यातील खडकी येथील चौदावर्षीय शाळकरी मुलगी तिचा मित्र राजू रायते यास भोकर येथे भेटण्यास 4 फेबु्रवारी रोजी आली होती. परंतु, त्याची भेट न झाल्यामुळे भोकर येथील डॉ. आंबेडकर चौकात ती थांबली. त्या वेळी सुनील सांभाळकर (रा. भोकर) तिला भेटला. मित्राकडे सोडतो म्हणून त्याने तिला ऑ टोत बसवून घेतले. तिला घेऊन तो नांदेड-भोकर रोडवर असलेल्या सीताखंडी घटातील चंद्रमा रिसॉर्ट येथे आला. तेथील चंद्रमा हॉटेलातील खोलीत नेऊन बलात्कार केला. यानंतर सांभाळकरने बाळू व संदीप (दोघेही रा.धानोरा, ता. भोकर) या दोघा मित्रांना बोलावून घेतले. या तिघांनी बेत आखून राजूला (रा. धानोरा) मिनी व्हॅन घेऊन येण्यास सांगितले. पीडित मुलीस व्हॅनमध्ये बसवून धानोरा शिवारातील गोविंदच्या शेतात नेले. तेथे रात्रभर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पहाटे भोकर येथील अब्दुल यास ऑ टो घेऊन येण्यास सांगितले. त्यांनी या मुलीस भोकर येथे सोडण्यास सांगितले.

अब्दुलनेही तिच्यावर 5 फेब्रुवारी रोजी बलात्कार केला. त्यानंतर भोकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तिला सोडून अब्दुल पसार झाला. पीडित मुलीने स्वत:ला सावरून घडलेला प्रसंग परिसरातील नागरिकांना सांगितला.
काही जणांनी मुलीला सोबत घेऊन पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार भोकर पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून भोकर पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी बडतर्फ पोलिस कॉन्स्टेबल
सन 2010 मध्ये पोलिस कॉन्स्टेबल सुनील सांभाळकरला बडतर्फ करण्यात आले होते. महिला पोलिस कर्मचा-या स आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.