आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभिमानीचा औशात बैलगाडी मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा - Divya Marathi
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा
लातूर - जिल्ह्यातील औसा शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. तीन वर्षांत मराठवाड्याला पावसाने बगल दिली आहे. औसा तालुक्यामध्ये तर तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे.
शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे यांच्या हस्ते तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी पाळीव कुत्र्यांनाही मोर्चात सहभागी केले होते.