आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swine Flue Has Affected To Chakurkar's Daughter In Law, Grand Child

चाकूरकर यांच्या सून, नातीला झाली स्वाइन फ्लूची बाधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - पंजाबचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डॉ. अर्चना पाटील (४२) यांना स्वाइन फ्लूची बाधा झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिली. चाकूरकरांची नात व डॉ. अर्चना यांची कन्या रुदाली (२०) यांनाही या आजाराची लागण झाली आहे.पुणे येथील प्रयोगशाळेने नमुने तपासल्यानंतर तसा अहवाल दिला आहे. येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून मायलेकींची प्रकृती उत्तम आहे.

डॉ. अर्चना पाटील या उदगीर येथील लाइफ केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या अध्यक्षा आहेत. दरम्यान, शनिवारी रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील देविदास व्यंकटी कुरे या संशयिताचा मृत्यू झाला होता. त्यांना टीबीचाही आजार होता. त्यांच्या स्वॅबचा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेकडून मिळाला नाही.त्यामुळे मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. लातूर जिल्ह्यात या आजाराचे थैमान सुरूच आहे.