आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Syed Shah Turabul Haq Sahab Urus News In Divya Marathi

पूर्वतयारी बैठक: भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी प्रशासन कटिबद्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या येथील सय्यद शाह तुराबुल हक साहेब उरुसास येत्या ३१ जानेवारीपासून सुरुवात होणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या उरुसासाठी प्रशासनाने जय्यत तयारी चालवली आहे.

उरुसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.२२) पूर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक नियती ठाकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, तहसीलदार संतोष रूईकर, वक्फ बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिज अहेमद, जिल्हा वक्फ अधिकारी शेख जिलानी यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, अधिकारी उपस्थित होते.
धार्मिक व सामाजिक सौहार्दाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या उरुसाची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. मराठवाड्यासह राज्यभरातून व शेजारच्या राज्यातूनही या उरूस यात्रेस भाविकांची मोठी हजेरी असते. १५ दिवस लाखो भाविक येत असल्याने प्रशासनाला मोठे नियोजन करावे लागते. यात्रेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमही होत असतात. त्यादृष्टीने पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे. गर्दीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यात यावे, कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना होणार नाहीत, यासाठी सर्व विभागांनी दक्षता बाळगावी. सर्व विभागांनी विविध सेवा-सुविधा तत्परतेने पुरवाव्यात. वीजपुरवठा सुरळीत राहील, याची खबरदारी वीज वितरण कंपनीने घ्यावी. बीएसएनएलनेही त्यांची यंत्रणा सुव्यवस्थित ठेवावी. अग्निशमन व अन्य सुरक्षा यंत्रणा सुसज्ज ठेवाव्यात. अन्नविषबाधेसारख्या दुर्घटना होणार नाहीत, याचीही दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश या वेळी देण्यात आले. उरुसामध्ये कव्वाली, शब-ए-गजल, मुशायरा, पवित्र कुराणाचे पठण असे विविध कार्यक्रम होणार आहेत.