आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना: आमदार प्रशांत परिचारकांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन / जाफराबाद- सैनिकांच्या परिवाराबद्दल अपशब्द काढणाऱ्या पंढरपूरच्या आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे तालुका माजी सैनिक संघटना शिवसेनेच्या वतीने भोकरदन पोलिस निरीक्षकांकडे करण्यात आली. तसेच भोकरदन येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात परिचारक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. 

या वेळी माजी सैनिक संघटनेचे बबन किसन शिंदे, देविदास पिसे, पंजाबराव पवार, दत्तात्रय कुदर, रामचंद्र गायके, रावसाहेब गायकवाड, नारायण शेळके, शिवसेनेचे तालुका प्रमुख नवनाथ दौड, महेश पुरोहित, सुरेश तळेकर, पंडित वाघमारे, दीपक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. सैनिक त्यांच्या कुटुबीयांचे जाहीर सभेत चरित्र्यहनन करून जो घोर अपमान केला, त्याबद्दल परिचारक यांचे सदस्यत्व रद्द करावे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत तीव्र शब्दांत निषेध केला.
 
दखलपात्र गुन्हा नोंदवा 
भारतीयसैनिक परिवाराबद्दल अपशब्द वापरून अवमान केल्याबद्दल सैनिकांचे मनोबल खचविल्याबद्दल आमदार परिचारक यांच्यावर दखलपात्र गुन्हा नोंदवावा, अशी मागणी भारतीय माजी सैनिक संघटनेतर्फे करण्यात आली. याबाबतचे निवेदन जाफराबाद पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष कुलदीप मुठ्ठे, रमेश विठोरे, रमेश रूपचंद धवलिया, मोतीराम पांडुरंग गायकवाड, रघुनाथ लाेखंडे आदींच्या सह्या आहेत. 
बातम्या आणखी आहेत...