आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उमरगा - उमरगा तालुक्यातील दगडधानोरा गावातील नागरिकांना पाण्यासाठी राज्याच्या सीमा ओलांडून कर्नाटकातून रुपयाला घागरभर पाणी आणावे लागत आहे. ‘दिव्य मराठी’ने गावाची स्थिती मांडताच तहसीलदारांसह गटविकास अधिकारी दगडधानो-यात दाखल झाले. त्यांनी कूपनलिकेच्या अधिग्रहणासह पाण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या वृत्ताची दखल घेऊन सामाजिक संघटना, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गावाला मदत करण्याचे ठरवले आहे. राज्याच्या सीमारेषेवर असलेल्या दगडधानो-यातील ग्रामस्थांना पाण्याअभावी नात्यागोत्याचाही विसर पडला आहे. वृद्धांना तांब्या-तांब्या पाणी मागून प्यावे लागत आहे. दैनिक ‘दिव्य मराठी’ने रविवार, दिनांक 24 मार्च रोजी ‘कर्नाटकातून आणावी लागते रुपयाला घागर’ या मथळ्याखाली गावक-यांच्या व्यथा मांडल्या होत्या. याची दखल घेऊन सामाजिक संघटनानी पुढाकार घेतला आहे.
प्रशासनालाही आता जाग आली आहे.
मंगळवारी प्रभारी तहसीलदार दिनेश झांपले, गटविकास अधिकारी बी.बी. खंडागळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता मुळे आदींनी दगडधानोरा गावास भेट देऊन गावातील पाणीस्थितीची माहिती घेतली. गावात आणखी एक कूपनलिका अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.
४दगडधानोरा गावास भेट देऊन तेथील परिस्थिती पाहिली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीस ठराव घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार एक कूपनलिका अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव देण्यास सांगितले आहे.’’
बी.बी.खंडागळे, गटविकास अधिकारी, पं. स. उमरगा
दगडधानोरा गावास भेट दिली असून यापुढे आवश्यकतेनुसार कूपनलिका किंवा टॅँकरचे प्रस्ताव तत्काळ मंजूर करून पाणीपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’’
दिनेश झांपले, प्रभारी तहसीलदार, उमरगा
मराठवाडा विकास प्रतिष्ठान मदत देणार
दैनिक ‘दिव्य मराठी’ने मराठवाड्यातील दुष्काळ राज्यासमोर मांडला आहे. दगडधानोरा गावातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी मराठवाडा विकास प्रतिष्ठान निधी देणार आहे. या संदर्भात 9 एप्रिलला पुण्यातील यशदामध्ये शिबिर व मदत या कार्यक्रमास राष्ट्रसंत भय्यू महाराज यांच्या उपस्थितीत निधी जाहीर केला जाईल. ’’ प्रकाश रमेश इंगोले, संस्थापक अध्यक्ष, मराठवाडा विकास प्रतिष्ठान, पुणे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.