आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या कायद्याचा फटका; पॅनलचे सर्व अर्ज बाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर/ लासूर स्टेशन - गंगापूर तालुक्यातील टाकळी कदीम येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळासाठी अर्ज भरतेवेळी नवीन सहकार कायद्यानुसार अर्ज सादर केल्यामुळे विरोधी असलेल्या पॅनलमधील सर्वच्या सर्व १३ उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले.

टाकळी कदीम येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून निवडणुकीचे अर्ज भरतेवेळी जय मातादी पॅनलच्या प्रमुखासह १३ जणांनी अर्ज भरताना नवीन सहकार कायद्यानुसार प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षर्‍या केल्या नव्हत्या. त्यामुळे छाननीत १३ अर्ज बाद ठरवण्यात आले.

या निवडणूक प्रक्रियेत सहकाराचा २०१४ च्या नवीन कायद्याच्या नियम २१/३ अन्वये सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. त्यावर उमेदवाराने त्यावर सही करणे आवश्यक आहे. संबंधित पॅनेलच्या उमेदवारांनी अर्ज शेवटच्या दिवशी भरले प्रतिज्ञापत्र अर्धवट भरून त्यावर सही केली नसल्याने अर्ज रद्द करण्यात आले.

गोंधळामुळे त्रुटी राहिल्या
सोसायटी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गडबडीत अर्जात अनेक त्रुटी राहिल्या होत्या. त्यामुळे पॅनलमधील सर्वच १३ जणांचे अर्ज बाद झाले आहेत. तीन दिवसांची मुदत असल्याने आम्ही आता अपील करणार आहोत. बाळकृष्णपंडितराव बनगे, प्रमुख, जय मातादी पॅनल

तीन दिवसांत अपील करता येणार
या संबंधात सहकार खात्यामधील जाणकारांकडून माहिती घेतली असता तीन दिवसांच्या आत या प्रकरणात अर्ज बाद झालेल्यांना स्वतंत्रपणे सहकार निबंधकांकडे सहकारच्या नवीन नियम क्र. १५२ नुसासर अपील करता येणार असून सहकार निबंधक याची सुनावणी ठेवून १४ दिवसांच्या आत त्यांना योग्य वाटल्यास रद्द केलेल्या उमेदवारांचे अर्ज निवडणुकीसाठी पुन्हा पात्र ठरवू शकतात.

अर्जावर सह्या नाहीत
नवीन नियमानुसार सूचक अनुमोदकांच्या जणांच्या स्वक्षर्‍या अर्जावर नाहीत. तसेच परिशिष्ट मध्ये अपूर्ण माहिती आहे, त्यात अपत्यांची माहिती नाही. एका अर्जावर एकूण सात स्वाक्षर्‍या असताना सर्व अर्ज सहीविना आहेत. एन.डी.बेडवाल, निवडणूक निर्णय अधिकारी