आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेवानिवृत्त तलाठी लाच घेताना रंगेहाथ अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूममधील सेवानिवृत्त तलाठी बाबासाहेब बागलाने यांना साडेचारशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला लाच घेण्याच्या कारणावरून सेवानिवृत्त तलाठी जाळ्यात अडकल्याच्या चर्चेने प्रशासकीय इमारतीमध्ये खळबळ उडाली.

देवी बाबूळगाव (ता. बीड) येथील रामदास धोंडिबा जोगदंड यांना सातबारा तहसीलमधून घ्यायचा होता. तहसीलमधील रेकॉर्ड रूममध्ये सेवानिवृत्त तलाठी बाबासाहेब बागलाने यांच्याशी जोगदंड यांनी संपर्क साधला असता त्यांनी लाचेची मागणी केली. यासंदर्भात जोगदंड यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्याकडे तक्रार दिली. त्यानुसार तहसीलमधील रेकॉर्ड रूममध्ये जोगदंड यांच्याकडून सातबारा देण्यासाठी साडेचारशे रुपयांची लाच घेताना पोलिसांनी अटक केली.