आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टमटम, टेम्पोच्या अपघातात डोकेवाडीचे २ ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईट - मालवाहू टेम्पो व टमटमच्या अपघातात डोकेवाडी येथील पती - पत्नीचा मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी असून यामध्ये दोन वर्षाचा चिमुकला बालंबाल बचावला. हा अपघात मंगळवारी (दि. ११) सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान घडला. या प्रकारामुळे डोकेवाडी गावात शोककळा निर्माण झाली आहे.
ईटहून एक मालवाहू टेम्पो (एमएच २५, पी.२५८०) मात्रेवाडीला जात होता. वेगात असलेल्या टेम्पोने भूमकडे जाणाऱ्या टमटमला (एमएच – बी २५, एम. सी. ५८६५) समाेरून धडक दिली. यामध्ये टमटम तीन कोलांट्या खाऊन रस्त्याच्या खाली पडला. तसेच टेम्पोही दूर फेकला गेला. टमटममधील डोकेवाडी येथील अण्णा बळीराम आहेर (४४), त्यांची पत्नी साखराबाई आहेर (३७) गंभीर जखमी झाले. त्यांना उपचार करण्यासाठी ईट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यातील साखराबाई यांचा मृत्यू झाला. अण्णा यांचा भूम येथे नेले जात असताना मृत्यू झाला. त्यांचा मुलगा स्वराज (२) हा चिमुकला अपघातातून बालंबाल बचावला. तसेच अन्य प्रवाशी ईश्वर बाबा शेजाळ व चालक सागर खैरे यांना बार्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. टेम्पोचालक अमोल धोंडीबा करडकर (रा. मात्रेवाडी) टेम्पोत दबला गेला. त्याला अन्य व्यक्तींनी बाहेर ओढून काढले. धडक इतकी मोठी होती की, दोन्ही वाहनांच्या पुढील बाजू चेंदा मेंदा झाला.
बातम्या आणखी आहेत...