आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्तरचं डोकं फिरलंया, मुलाला खुर्चीनं मारलंया; पॅटर्नला काळिमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका मागितल्याचा राग मनात धरून येथील नामांकित समजल्या जाणाऱ्या देशीकेंद्र विद्यालयातील शिक्षकाने विद्यार्थ्याच्या डोक्यात खुर्ची घातली. त्यात त्याचे डोके फुटले आहे. आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षकाविरोधात गांधी चौक पोलिस ठाण्यात तीन डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकाश नीला असे शिक्षकाचे नाव असल्याचे फिर्यादीत नोंदवले आहे.

येथील आकाश पंडित पिटले हा देशीकेंद्र विद्यालयात दहावीत शिकत आहे. एक डिसेंबर रोजी त्याने वर्गातील शिक्षक प्रकाश नीला यांना प्रथम सत्र परीक्षेची उत्तरपत्रिका मागितली. त्यावर नीला भडकले व त्यांनी वर्गातील खुर्ची अाकाशच्या डोक्यात घातली. यात तो जखमी झाला. तेव्हापासून त्याच्या मनात भीती बसली अाहे. नीला व शाळेतील अन्य शिक्षकही आकाशला धमकावत असून त्यामुळे शाळेत जाण्याची मानसिकता त्याच्यात नसल्याचेे आकाशच्या आई पी. पी. पिटले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी शिक्षण उपसंचालक व मुख्याध्यापकांनाही या घटनेबद्दल कळवले आहे.
संचालक मंडळातील दोन गटांत शीतयुद्ध
संस्थेच्या संचालक मंडळात गिरवलकर व बिडवे असे दोन गट आहेत. काही वर्षांपासून या दोन गटांत शीतयुद्ध सुरू आहे. यापूर्वीही गटबाजीमुळे ही संस्था चर्चेत आली होती. खुर्ची प्रकरणाने पुन्हा गटबाजी उफाळून आल्याची चर्चा आहे.
प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले, चौकशी सुरू
^हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले असून उपशिक्षणाधिकारी राम गारकर हे चौकशी करीत आहेत. चौकशी अहवाल येताच त्यानुसार कार्यवाही केली जाईल. दोषींची गय केली जाणार नाही. मात्र, प्रकरणातील सत्यताही तपासून पाहणार.
- डॉ. गणपत मोरे, शिक्षणाधिकारी
^उत्तरपत्रिका देत असताना मुलांनी एकच गर्दी केली होती. या वेळी खुर्ची उचलून बाजूला ठेवत असताना ती आकाशच्या डोक्याला लागली. निला यांनी ती जाणीवपूर्वक मारली नाही. शाळेतील गटबाजीमुळे या घटनेचे काही जण राजकारण करत आहेत. असे असले तरी निला यांनी खुर्ची बाजूला ठेवताना काळजी घ्यायला हवी होती. ती न घेतल्यामुळे मी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. याप्रकरणाचा तपास करू. -
- पी. के. कर्पे, मुख्याध्यापक, देशीकेंद्र विद्यालय
बातम्या आणखी आहेत...