आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशासाठी सावकाराची मारहाण; गेवराईत शिक्षकाची आत्महत्या, सुसाइड नोट लिहून घेतला गळफास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई- घरखर्चासाठी व्याजाने घेतलेले पैसे खासगी सावकाराला परत करूनही त्याने तगादा लावत मारहाण केल्याने गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने सुसाइड नोट लिहून राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.

श्रीकृष्ण गंगाधर चौधरी (४८) आम्ला जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेत शिक्षक होते.  गेवराई शहरात ते राहत होते. दोन दिवस सुट्या असल्याने ते  कुटुंबासह  कुंभारवाडी येथे गेले होते. शनिवारी सकाळी कामानिमित्त बाहेर जात असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते.  शनिवारी रात्री ते बाहेरच होते. पहाटे ४.२० वाजता त्यांनी मुलगा अमोल याला फोन करून कल्याण तळेकर याने मारहाण करून मला जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे सांगितले. मुलाने त्यांना घरी येण्यास सांगितले. घरी आल्यानंतर  अपमान सहन न झाल्याने चौधरींनी सुसाइड नोट लिहून रविवारी पहाटे फॅनच्या रॉडला दोरी बांधून  आत्महत्या केली.  या प्रकरणी मादळमोही येथील किरण गावडे, कल्याण तळेकर, केशव गावडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सर्वच आरोपी फरार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...