आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत शिक्षकांचे धरणे आंदोलन, प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी पाऊल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाकडून प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होऊ शकत नसल्याच्या निषेधार्थ राज्य प्राथमिक शिक्षक परिषद जिल्हा शाखेच्या वतीने बुधवारी येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले.
शिक्षकांनी वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर काही प्रश्नच निकाली निघू शकले. काही प्रश्न शिक्षण विभागाशी, तर काही प्रश्न मुख्य लेखा व वित्त विभागाशी संबंधित आहेत. या प्रश्नांसंदर्भात वेळोवेळी निवेदने दिल्यानंतर अधिका-यांशी झालेल्या चर्चेनंतरही ते निकाली निघू शकलेले नाहीत. त्यामुळे शिक्षक परिषदेने बुधवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत धरणे आंदोलन केले. यात भविष्य िनर्वाह निधीच्या पावत्या देण्यात याव्यात, केंद्रप्रमुखांची रिक्त पदे ही पात्र शिक्षकांमधून भरावीत आदी मागण्यांचा समावेश आहे.