आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसमत येथे शिक्षकाचा खून; दोघे ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - वसमत शहराजवळील इंद्रप्रस्थनगर या नवीन वसाहतीत शिक्षकाचा खून करण्यात आल्याची घटना उघड झाली असून याबाबत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे मात्र उघड केली नाहीत.
मारुती विठ्ठल पोटे (४५) असे मृत शिक्षकाचे नाव अाहे. इंद्रप्रस्थनगरातील त्यांच्या घराच्या बांधकामावर पोटे मृतावस्थेत आढळले. पूर्णा पंचायत समितीमध्ये ते कार्यरत होते. ते घराचे बांधकाम करत होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बांधकाम झाल्यावर मजूर निघून गेले. बांधकामाचे साहित्य कामावर पडलेले असल्याने ते तेथेच झोपले. मध्यरात्री अज्ञात आरोपींनी मारहाण करून पोटे यांचा दोरीने गळा आवळून खून केला. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यावर वसमतचे उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, पोलिस निरीक्षक अशोक मैदाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचामना केला. त्यानंतर पोलिस अधीक्षक कैलास कणसे यांनीही वसमत येथे भेट देऊन प्रकरणाबाबत माहिती घेतली.
वसमत पोलिसांनी या प्रकरणी तपासचक्रे गतिमान करून दोन संशयित आरोपींना दुपारी दोनच्या सुमारास ताब्यात घेतले. मृताची पत्नी गोदावरी पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...