आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिकेची आत्‍महत्‍या; फ्लॅट नावावर करून देण्‍यासाठी प‍तीकडून सुरू होता छळ, सुसाइड नोटमध्‍ये खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- फ्लॅट नावावर करून देण्यासाठी शिक्षिका पत्नीचा  छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आष्टी ठाण्यातील पोलिस शिपाई भारत रामा व्हरकटे याच्यासह अन्य सहा जणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारत व्हरकटेची पत्नी चैताली हिने ७ सप्टेंबर रोजी  माळेवाडी शिवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान विवाहितेने आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी स्कूटीच्या डिक्कीत सापडली असून तिच्या भावाने ही चिठ्ठी  पोलिसांना दिली आहे.   

बीड येथील जनमेजय विद्यालयातील शिक्षिका चैताली यांचे लग्न सात वर्षांपूर्वी आष्टी ठाण्यात कार्यरत असणारा बीड जिल्हा पोलिस दलातील शिपाई भारत रामा व्हरकटे (रा. माळेवाडी, ता. शिरूर ) याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर पती भारत, सासू सुदामती, जाऊ उषा शरद व्हरकटे, आजे-सासरे मारुती व्हरकटे, दीर शंकर व्हरकटे, तिचे चुलते गोवर्धन साहेबराव शेळके यांनी चैतालीचा छळ सुरू केला. चार वर्षांपूर्वी माहेरच्या लोकांनी बीड येथील एक  प्लॉट  चैतालीच्या नावावर करून दिला होता. हा प्लॉट माझ्या नावावर करून दे, तुझा पगार माझ्याकडे दे , नाहीतर तुझी नोकरी सोडून दे, असा तगादा पती भारत व्हरकटे याने चैतालीकडे लावला होता.  
बातम्या आणखी आहेत...