आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टीम अण्णा’तर्फे प्रचारपत्रक जारी, राजकीय पक्षांवर टीका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाच राज्यांतील निवडणुकांसाठी ‘टीम अण्णा’ने प्रचारपत्रक जारी केले आहे. त्यात लोकपाल लोकपाल मंजूर करवून घेण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा व त्यांनी देशाला धोका दिल्याचा ठपका काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे.
टीम अण्णाने प्रचारात राजकीय पक्षांवर टीका करणार नसल्याचे जाहीर केले होते. परंतु लोकपाल विधेयक मंजूर न होण्याचा ठपका काँग्रेसवर ठेवत पक्षाला टीकेचे लक्ष्य बनवण्यात आले आहे. टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल व प्रशांत भूषण यांनी प्रचारपत्रक प्रसिद्ध केले. ‘आप का वोट भारता का इतिहास बदल सकता है’ केंद्र सरकारका देश के साथ धोखा असा या पत्रकाचा मथळा आहे. या चारपानी पत्रकात भाजप, काँग्रेस, बसपासह राजकीय पक्षांना काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. हे पत्रक कुण्या पक्षाच्या विरोधात नाही. भ्रष्टाचार, लोकपाल व भूमी अधिग्रहण या महत्त्वाच्या मुद्यांबाबत ‘टीम अण्णा’ चे अभियान आहे, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
राजकीय पक्षांना प्रश्न : लोकपाल विधेयक हे कमजोर आहे हे तुम्ही मानता का? सीबीआयला सरकारी नियंत्रणातून मुक्त असावे हे तुम्हाला मान्य आहे काय? भूमि अधीग्रहण मुद्यावर तुमची काय भूमिका आहे, तुम्ही संसदेत या विधेयकाला विरोध करणार का? असे प्रश्न राजकीय पक्षांना विचारण्यात आले आहेत.
राहुल गांधींवर टीका : काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावरही या पत्रकात टीका करण्यात आली अहे काँग्रेसशासित राज्यांत उत्तरांचलच्या धर्तीवर सशक्त लोकपाल आणण्याची हिंमत दाखवणार का? असे राहुल यांना विचारण्यात आले आहे.

सहा धोके
‘टीम अण्णा’ ने सर्व राजकीय पक्षांना सहा प्रश्न विचारले आहेत. लोकपालच्या मुद्यावर केंद्र सरकारने देशाला दिलेल्या सहा धोक्यांचा उल्लेख या पत्रकात आहे. काँग्रेसचे सशक्त लोकपाल विधेयक या मथळ्याखाली सरकारी लोकपाल विधेयकातील त्रुटी अधोरेखित करण्यात आल्या आहेत.