आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद येथे उष्णतेच्या प्रकोपामुळे बाजारपेठेत शुकशुकाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- गेल्या वर्षीचाच उन्हाळा यापेक्षा बरा होता, असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. गेल्या आठवड्यापासून शहरात सरासरी ४१ ते ४२ अंशांवर तापमानाचा पारा स्थिरावत आहे. दुपारी १२ पासून बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. शहरांतील नेहमी गजबजलेल्या रस्त्यांवरही शांतता आहे. गेल्या आठवड्यापासून उन्हाच्या प्रकाेपामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. 

उन्हाळ्यामध्ये दिवसेंदिवस तापमानाचा पारा वधारत आहे. दुपारी बाहेर पडणे म्हणजे दिव्य असल्यासारखी परिस्थिती आहे. सकाळी १० वाजेपासून उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात हाेत आहे. घराच्या बाहेर पडण्यास नागरिकांचे धाडसच होत नाही. घरातच कुलर, एसी, फॅनपासून शीतलता मिळवत राहण्याला नागरिक पसंती देत आहेत. याचा परिणाम थेट बाजारपेठेवर झाला आहे. सातत्याने गजबजलेला असलेला शहरातील नेहरु चौक, निंबाळकर गल्ली, गवळी गल्ली, मारवाड गल्ली, भाजी मंडई, बार्शीनाका परिसरात दुपारी १२ ते एक वाजेच्या सुमारास शुकशुकाट जाणवत आहे. सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. सुरुवातीला दुकानदार ग्राहकांची प्रतीक्षा करत बसून राहत होते

आता मात्र, दुकानदारही दुपारच्या वेळी दुकाने बंद ठेवण्याला पसंती देत आहेत. मेडिकल दुकाने अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहत आहेत. अन्य दुकाने मात्र, बंद ठेवली जात आहेत. शहरातील रस्त्यांचीही अशीच परिस्थिती आहे. शहरातील मेनरोड, समतानगर, भाेसले हायस्कूल परिसर आदी ठिकाणी सातत्याने गर्दी दिसत असते. मात्र, आता येथेही शुकशुकाट जाणवत आहे. 

पारासरासरी ४२ वर : गेल्याआठ दिवसांमध्ये शहरात तापमानाचा पारा सरासरी ४१ ते ४२ अंशांवर स्थिरावत आहे. शनिवारी तर पारा ४३ अंशांवर गेला होता. आतापर्यंतचे सर्वात अधिक तापमानाची यावेळी नोंद करण्यात आली होती. शहराच्या तुलनेच ग्रामीण भागात कमी तापमान जाणवत असले तरी यामध्ये विशेष फरक नाही. ग्रामीण भागातही उष्णतेचा प्रकोप ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. 
 
ग्राहक रोडावले 
सकाळी सायंकाळच्यादरम्यानच ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. दुपारी ग्राहक बाहेर येत नाही. यामुळे व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे. ग्राहकांची संख्या बरीच रोडावली आहे. 
- सचिन कंदले, दुकानदार.
बातम्या आणखी आहेत...