आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Temporary Teacher Suicide At Nanded, Education Minister Name Mention In Suicide Note

नांदेडमध्ये शिक्षकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये‍ विनोद तावडेंसह शिक्षण सचिवांचे नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- शहरातील इतवारा भागा एका अंशकालीन शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सय्यद रईसउद्दीन असे मृत शिक्षकाचे नाव आहे. सय्यद रईसउद्दीन यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांच्या नावांचा उल्लेख केला आहे. या घटनेमुळे राज्यातील अंशकालीन शिक्षकांचा मुद्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद रईसउद्दीन हे कला शिक्षक म्हणून अंशकालीन तत्त्वावर कार्यरत होते. मात्र, त्यांना गेल्या दोन वर्षांपासून कामावरून कमी करण्यात आले होते. त्यामुळे वैफल्यग्रस्त सय्यद रईसउद्दीन यांनी गळफास घेवून आत्महत्या केली.

मृत सय्यद सईसउद्दीन यांचे पार्थिव त्यांच्या नातेवाईकांनी इतवारा पोलिस ठाण्यात नेऊन ठेवले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सय्यद यांच्या नातेवाईकांनी केली आहे. या दोघांनी सय्यद यांना आत्महत्या करण्यात प्रवृत्त केल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. त्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सय्यद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, शिक्षण अधिकार कायद्यअंतर्गत राज्यात 18 हजार 645 पदे निर्माण झाली होती. त्यातील 12 हजार 823 पदे भरण्यातही आली. मात्र, दोन वर्षापूर्वी या सर्व अंशकालीन शिक्षकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. नोकरी गेल्याने हजारो शिक्षकांवर उपासमारीची कुर्‍हाड कोसळली आहे.