आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिंदुसरेवरील पूल बांधकामाचे तातडीने टेंडर काढण्याचे आदेश; नितीन गडकरी, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- बिंदुसरा नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार विनायक मेटे यांच्या आग्रहास्तव शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी शुक्रवारी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीतच बिंदुसरा नदीवर  बंधाऱ्यासहीत पूल बांधकामाला मान्यता देण्यात आली असून पुलाचे टेंडर काढण्याचे आदेश गडकरी यांनी दिले असून  सात दिवसांत म्हणजे १७ सप्टेंबरपर्यंत बीड बायपास सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
  
मुंबई येथे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या विशेष बैठकीला केंद्रीय रस्ते विकास  मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री ना. एकनाथ शिंदे, आ. विनायक मेटे, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, शिवसंग्रामचे युवक प्रदेश अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या उपस्थितीत बिंदुसरा पुलावरील पूल बांधकामाचे टेंडर  तातडीने काढून बांधकाम सुरू करण्याचे आदेश दस्तुरखुद्द  नितीन गडकरी यांनी दिले आहेत. होणारा नवीन पूल हा बंधाराकम पूल पध्दतीने उभारण्यात यावा, अशा सूचना दिल्या.  शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी चार पदरी बायपासची एक लेन १७  सप्टेंबर २०१७ पर्यंत सुरू करा. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत सात दिवसांच्या आत पर्यायी रस्ता दुरुस्त करून तो सुरू करावा  या पर्यायी रस्त्यावरून अवजड वाहन वगळता दुचाकी, तीनचाकी, चारचाकी बस यांच्याकरिता हा पर्यायी रस्ता खुला करावा, अशा सूचना गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कामामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. या पूल बांधकामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले आहे.  

आयआरबीचे पथक  १२ रोजी पाहणी करणार   
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून बिंदुसरा नदीवरील पूल बांधकामास गती देण्यासाठी व पर्यायी रस्ता खुला करण्यासाठी  आयआरबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक आ. विनायकराव मेटे यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी १२ व १३  सप्टेंबर रोजी बीड येथे येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...