आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tenth Injured In Cantainer Bus Accident, Four Serious In Parli

परळीमध्‍ये कंटेनर-बस अपघातात दहा जखमी, चार गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - भरधाव कंटेनर आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात बसमधील दहा प्रवासी जखमी झाले असून चार प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तळेगावनजीक हा अपघात घडला.कंटेनरच्या धडकेत एसटी बसची उजवी बाजू कापली गेली.
परळी आगाराची परळी-नांदगाव ही बस (एमएच 14 बीटी 3345) सिरसाळामार्गे जाण्यासाठी रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बसस्थानकातून निघाली. साधी बस असल्याने प्रवासी घेत बस चालली होती. याच वेळी परळीजवळील तळेगाव शिवारात सिरसाळ्याकडून भरधाव कंटेनरने (एमएच 06 एमक्यू 3117) एसटीला उजव्या बाजूने
धडक दिली. यात बस उजव्या बाजूने चिरली गेली.
या अपघातात बसमधील शेख इब्राहिम शेख उस्मान (रा. नांदगाव), सरय्या जंगम (आंध्र प्रदेश), अनिल फुलारी, मंगल महादेव जोगदंड, यासीन अझिमोद्दीन शेख, वजीर कुरेशी, महादेव नामदेव जोगदंड, सय्यद समीर, शेख महेबूब, श्याम शेषेराव बीडगर (सर्व रा. परळी वैजनाथ) हे प्रवासी जखमी झाले.