आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ते हेलिकॉप्टर लष्कराचेच, बिघाडाच्या भीतीने केले होते इमर्जन्सी लँडिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सलग दोन दिवस जालना जिल्ह्यात इमर्जन्सी लँडिंग केलेली हेलिकॉप्टर्स लष्कराचीच होती. तांत्रिक बिघाडाची शंका आल्याने ती जालन्यात उतरली. मात्र सर्व काही सुरळीत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी परत उड्डाण केल्याची माहिती लष्कराच्या सदन कमांडने दिली आहे. सरावाच्या हेलिकॉप्टरची माहिती देणे बंधनकारक नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

आणि ऑगस्ट रोजी लष्कराचे हेलिकॉप्टर जालना जिल्ह्यात उतरले होते. सोमवारी सकाळी अंबड तालुक्यातील नागझरी येथे हेलिकॉप्टर उतरले हाेते. तर मंगळवारी दोन हेलिकॉप्टर परतूर तालुक्यातील पारडगाव येथे उतरले होते. दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये प्रत्येकी तीन जवान होते. १० मिनिटे थांबून हेलिकॉप्टर परत निघून गेले. विशेष म्हणजे हेलिकॉप्टर विषयी महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त, पोलिस खाते किंवा विमानतळ प्राधिकरणाला काहीही माहिती नव्हती. 

अचानक लँडिंगमुळे ग्रामस्थांमध्ये तर्कवितर्क लढवले जात होते. या प्रकारावरील पडदा उठवण्यासाठी दिव्य मराठीने लष्कराच्या पुण्यातील सदन कमांडच्या मुख्यालयाला संपर्क साधला. येथे आयएफए विभागातील कर्नल शिरवळकर यांनी या लँडिंगविषयी माहिती सांगितली. तर लष्कराचे जनसंपर्क अधिकारी आयआयएस महेश अय्यंगर यांनी एका मेेलमार्फत ही माहिती दिव्य मराठीला पाठवली. हे प्रशिक्षणार्थी हेलिकॉप्टर असल्यामुळे याची स्थानिक प्रशासन किंवा विमानतळ प्राधिकरणाला माहिती देणे बंधनकारक नसल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे. 

...अन् वॉर्निंग सिग्नल वाजला 
लष्कराच्याहेलिकॉप्टर डिव्हिजनतर्फे जवानांना हेलिकॉप्टरचे प्रशिक्षण दिले जाते. याअंतर्गत दरवेळेस वेगवेगळ्या आकाशात ही हेलिकॉप्टर नेली जातात. हेलिकॉप्टरमध्ये दाेन प्रशिक्षणार्थी आणि एक प्रशिक्षक असे तिघे जण असतात. आणि रोजी या अंतर्गतच प्रशिक्षक हेलिकॉप्टर घेऊन जालनाकडे निघाले हाेते. या वेळी हेलिकॉप्टरमधून वॉर्निंग सिग्नल वाजला आणि वॉर्निंग लाईट सुरू झाला. धोका जाणवल्याने त्यांनी मिळेल त्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर उतरवले. मात्र, तपासणी केल्यावर त्यात काही बिघाड नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी परतीचा प्रवास केला. 
बातम्या आणखी आहेत...