आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’ रक्कम कायदेशीरच, प्रशासकाकडून बँकेत जमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कपाटात असलेल्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटांचा पंचनामा करण्यासाठी महाविद्यालयाच्या कार्यकारिणी मंडळाचे पदाधिकारी सुधाकर नागरगोजे यांनी काही दिवसांपूर्वी संबंधितांकडे तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी प्रशासकांनी पंचनामा करून सुमारे १८ लाख बँकेत जमा केले. सदरची रक्कम विद्यार्थ्यांनी शिकवणीपोटी महाविद्यालयाकडे जमा केल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य, अध्यक्ष व संचालकांचा वाद सुरू आहे. त्यातच गेल्या महिन्यात मोठ्या नोटांवर बंदी आल्याने नागरगोजे यांनी तक्रार केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्राचार्यांच्या कपाटात १००० आणि ५०० रुपयांच्या लाखोंच्या नोटा आहेत. परिणामी या नोटांचा पंचनामा करून त्या कोणाच्या आहेत व महाविद्यालयात कशा आल्या याचा तपास करण्याची मागणी केली होती.

वारंवार होणाऱ्या वादामुळे महाविद्यालयाचा कारभार सध्या प्रशासकाकडे देण्यात आला आहे. नांदेड येथील प्रा. ऊर्मिला धूत या प्रशासक म्हणून काम करत आहेत. धूत या सोमवारी महाविद्यालयात आल्या होत्या. त्यांनी महाविद्यालयात जाण्यासाठी पोलिसांकडे संरक्षण मागितले होते. त्यानुसार पोलिसही देण्यात आले होते. प्रा. धूत यांनी पत्रकारांसमक्ष नोटा मोजून त्या बँकेत भरल्या. सदरची रक्कम १८ लाखांची असून ती कायदेशीरच असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...