आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीची घोषणा म्‍हणजे फक्‍त शब्‍दांचा खेळ, सरकारकडे नियोजनच नाही- अजित पवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - आम्ही आंदोलने केली, जेलभरो केले, पवार साहेबांनीही वेळोवेळी सरकारला धारेवर धरले, त्यानंतर तब्बल अडीच वर्षांनंतर एकदाची कर्जमाफी सरकारने घोषित केली. परंतु आम्ही माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीनुसार सरकारकडे कर्जमाफीचा निश्चित आकडा नाही की लाभार्थी किती आहेत याचीही माहिती नाही आणि पैसा कसा उभारणार याचेही काही नियोजन नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हाती घेतलेल्या राज्यव्यापी संघटन आढावा दौऱ्यानिमित्त मंगळवारी येथील आझम कॉलनी भागातील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला संबोधित केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. या वेळी पवार म्हणाले,  आमच्या पक्षाच्या मंत्र्यांनीही अर्थ खाते सांभाळले आहे. पैसा कसा उभा करायचा, तो कसा खर्च करायचा हे सर्व आम्ही केले आहे. परंतु या सरकारकडे हे नियोजनच नसून सरकार केवळ शब्दांचा खेळ करत आहे. कर्जमाफी घोषित केली असली तरी ती कशी असणार, सरसकट की कशी हे अद्याप सरकारने स्पष्ट केले नाही.

पर्यावरण मंत्र्यांनी वातावरण दूषित करू नये - तटकरे  
सुनील तटकरे यांनी रामदास कदम यांच्या हिंगोलीत नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेतील वक्तव्याचा समाचार घेतला. रामदास कदम यांना आता निव्वळ उठाठेव करण्याचे काम लागले आहे. केवळ उद्धव ठाकरे यांची मर्जी सांभाळायची म्हणून सतत राष्ट्रवादीवर काही ना काही टीका करायची म्हणून कदम बोलत असतात. ते पर्यावरण मंत्री असून त्यांनी राजकीय वातावरण दूषित न केलेलेच बरे, असे ते म्हणाले.
 
बातम्या आणखी आहेत...