आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांपत्यासह मुलाचा मृतदेह विहिरीत सापडला, शरीरावर शस्त्राचे वार; खुनाचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई- गेवराई तालुक्यातील सुशी येथील पती-पत्नीसह मुलगा अशा तिघांचे मृतदेह विहिरीत आढळून आले. दांपत्याच्या डोक्यावर, तर मुलाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार अाहेत. नातेवाइकांनी  खुनाचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, बुधवारी तिघांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.  

सुशी येथील एका दांपत्यासह त्यांचा एक लहान मुलगा शेतात ज्वारी पिकाची खुरपणी करण्यासाठी गेले असता ते सोमवार (३० ऑक्टोबर) पासून बेपत्ता होते. दरम्यान, मंगळवारी (३१ ऑक्टोबर)  दुपारी यातील पत्नीचा मृतदेह विहिरीत आढळून आला.  बुधवारी (१ नोव्हेंबर)  सकाळी पती व मुलांचाही मृतदेह विहिरीत आढळून आला. मात्र या घटनेचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत, फौजदार रामकृष्ण सागडे  करत आहेत.   गेवराई तालुक्यातील सुशी येथील तुळशीराम लक्ष्मण पवार (३२), पत्नी जयश्री  पवार (२८) व मुलगा सुरेश (७) हे तिघे सोमवारी  सकाळी गावापासून २ किमी अंतरावर माळरान  शेतात ज्वारीची खुरपणी करण्यासाठी गेले होते.  रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचले नव्हते. घरी न आल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला.  परंतु शोध लागतच नव्हता. तेव्हा तुळशीरामचा मोठा भाऊ राजेंद्र पवार  याने गेवराई पोलिस ठाण्यात धाव घेऊन भावासह भावजय व पुतण्या हरवल्याची तक्रार  पोलिस ठाण्यात दिली होती.  अधिक तपास पोनि सुरेश बुधवंत करत आहेत.    
 
 
शेतीलगतच्या शेतकऱ्याच्या विहिरीत सापडले मृतदेह
मंगळवारी नातेवाइकांनी त्यांचा शेतात शोध सुरू केला असता शेजारच्या एका शेतकऱ्याच्या विहिरीजवळ मुलाची चप्पल सापडली. संशय आल्याने ग्रामस्थांनी सोलीला गळ बांधून विहिरीत फिरवला तेव्हा जयश्री तुळशीराम पवार हिचा मृतदेह दुपारी २ वाजेच्या सुमारास आढळून आला. त्यानंतर पती व मुलाचा  शोध सुरूच होता. विहिरीत सात परस पाणी असल्याने मृतदेह शोधताना अडथळे आले. बुधवारी सकाळी  तुळशीराम लक्ष्मण पवार (३२), मुलगा सुरेश तुळशीराम पवार (७) या दोघांचे मृतदेह आढळून आले. मुलाने वडिलांच्या पायाला मिठी मारलेल्या अवस्थेत मृतदेह  तरंगताना आढळले. दोघांचे मृतदेह बाजेच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. 
 
रॉकीने घेतला दोन तास माग    
पोलिसांनी जयश्री पवारसह  तुळशीराम व सुरेश या तिघांचे मृतदेह  उत्तरीय तपासणीसाठी  बीड  जिल्हा रुग्णालयात पाठवले. नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने बीड येथील श्वानपथकास  पाचारण करण्यात आले. रॉकी नावाच्या श्वानाने  दोन तास शेत परिसरात माग  घेण्याचा प्रयत्न केला. 
 
पुढील स्‍लाइडवर पहा अन्‍य फोटो...
बातम्या आणखी आहेत...