आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातून निघून गेलेला भाऊ तब्बल 33 वर्षांनी परतला; 1948 मध्ये गेले हेाते घर सोडून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- दारात उभ्या  असलेल्या व्यक्तीला आपण कोण आणि कोण हवं आहे, अशी विचारणा करणाऱ्या सेवानिवृत्त पोस्टमास्तरला समोरच्या व्यक्तीने सर्व हकिगत सांगितल्यानंतर गळ्यात पडून रडण्याशिवाय काहीच सुचेनासे झाले. ३३ वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला लहान भाऊ परत आल्याचा आनंद केवळ आणि केवळ आनंदाश्रू ढाळून दोन्ही भाऊ व्यक्त करीत असल्याने पाहणाऱ्यांनाही गहिवरून आल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथे घडली. 

 
औंढा  तालुक्यातील सिद्धेश्वर येथील रहिवासी असलेले नारायण नामदेव पाथरकर (५९) हे १९८४ मध्ये घरातील किरकोळ कारणावरून घर सोडून निघून गेले होते.  एकदा घर सोडून निघून गेल्यावर नामदेव पाथरकर यांनी पुन्हा घराकडे न फिरकण्याचा निर्णय घेतला. तारुण्यात असलेल्या नारायण यांनी रंगाच्या भरात, कुटुंबीयांशी सर्व नातेसंबंध तोडले आणि थेट सुरत गाठले. घरच्यांना कधीही बोलणार नाही की त्यांच्या कोणत्याच सुख-दुःखात सहभागी होणार नाही, अशी मनाशी खूणगाठ त्यांनी बांधली आणि सुरत येथेच एका कंपनीत काम करीत आपला उदरनिर्वाह सुरू केला. तेथे स्थायिक झालेल्या नारायण यांनी लग्न करून कुटुंबासह राहणे पसंत केले. परंतु गाव सोडल्याचे शल्य, कुटुंबीयांशी क्षुल्लक कारणावरून घेतलेली फारकत त्यांच्या मनाला बोचत होती. एवढ्या मोठ्या काळानंतर घरी कोणी आहे की नाही हेही त्यांना माहीत नव्हते, की गावाच्या व्यक्तीचा  संपर्क नंबरही नव्हता. परंतु गावाच्या आणि कुटुंबीयांच्या भेटीच्या ओढीमुळे ते एकटेच गावाकडे आले. त्यांचा मोठा भाऊ जयराम नामदेव पाथरकर (६२) हे आपल्या कुटुंबासह अकोला येथे राहत आहेत. सेवानिवृत्त झाल्यामुळे कधी कधी ते सिद्धेश्वर येथे येतात आणि गावाच्या मंडळींची भेट घेतात. 


 योगायोगाने आले सिद्धेश्वर
२७ नोव्हेंबर रोजी योगायोगाने ते सिद्धेश्वर येथे  आले होते. मोठ्या योगायोगाने त्याच दिवशी घरात बसून आराम करीत असलेल्या जयराम पाथरकर यांना दारात एक व्यक्ती आलेला  दिसली. त्यांनी विचारणा केली, कोण हवे आहे आणि आपण कोण आहात? मी जयराम पाथरकर यांचा भाऊ नारायण आहे असे उत्तर मिळताच, जयराम घराबाहेर आले आणि खोदून खोदून समोरच्या व्यक्तीला विचारणा करू लागले. सर्व खात्री पटल्यावर मात्र दोघांनाही राहवले नाही. एकमेकांच्या गळ्यात पडून केवळ ढसाढसा रडण्याशिवाय त्यांना काहीही सुचेना. त्यांच्या रडण्याच्या आवाजामुळे जमा झालेल्या गावकऱ्यांना माहिती कळल्यावर पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. बंधुप्रेमामुळे, घराच्या ओढीमुळे ३३ वर्षांनंतर  गावात परतलेल्या  नारायण पाथरकर यांना गावातील बालपणीच्या मित्रांनी पाहुणचार केला. 

 

दोघेही भाऊ औंढा नागनाथ येथे नागनाथाचे दर्शन घेऊन पुढील प्रवासाला निघाले. जयराम यांचे सर्व कुटुंब अकोला येथे स्थायिक झाल्याने नारायणसह ते ३० नोव्हेंबर रोजी अकोल्याला गेले.

बातम्या आणखी आहेत...